चिंचवडच्या उषाताई गोरे यांचे निधन!

चिंचवडच्या उषाताई गोरे यांचे निधन!
चिंचवड प्रतिनिधी
सखी न्युज लाईव्ह
चिंचवड-चिंचवडेनगर येथील सौ उषा बापूसाहेब गोरे(वय ४२)यांचे शुक्रवार (दि १३)रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे सासू,पती व दोन मुले असा परिवार आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव व महाराष्ट्र सोशल मीडिया महाराष्ट्राचे प्रमुख बापूसाहेब गोरे यांच्या त्या पत्नी असून चिंचवड परिसरात त्यांचा माहिलावर्गात दांडगा जनसंपर्क होता.”उषाताई” या नावाने त्या “परिचित” होत्या.त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.