पिंपरीत सत्ताधारी भाजपा शहरातील दुर्बल घटकातील कष्टकऱ्यांना तीन हजार रुपये अनुदान लॉकडाऊन संपल्यानंतर देणार का?-कष्टकरी महिलांचा संतप्त सवाल!
पिंपरी-(प्रतिनिधी) सखी न्युज लाईव्ह
सायली कुलकर्णी
कोरोनाच्या भीषण काळात पिंपरी चिंचवड शहरातील कष्टकरी दुर्बल घटकातील नागरिकांना अनुदान म्हणून तीन हजार रुपये त्वरित वाटप करण्याची घोषणा करणारे सत्ताधारी भाजप लॉकडाऊन संपल्यानंतर अनुदान वाटप करणार आहेत का?असा सवाल कष्टकरी महिला विचारत आहेत.
देशात कोरोनाचा हाहाकार चालू असून अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.होणाऱ्या उपासमारीतुन पिंपरी चिंचवड शहरातील दुर्बल घटकातील नागरिकांना दिलासा मिळावा व येणारे वर्ष निवडणूकीचे असल्याने राजकारणाचा फायदा व्हावा या हेतूने महापालिका सत्ताधारी भाजपने 15 एप्रिल रोजी म्हणजे एका महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक,घरकाम करणाऱ्या महिला,सलून दुकानातील कर्मचारी,जिम ट्रेनर,रस्त्यावरील चर्मकार इत्यादी कष्टकरी नागरिकांना तीन हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली व ती तीन हजार रक्कम एका आठवड्यात कष्टकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा केली.
घोषणा करून एक महिना संपल्यानंतरही अजून साधे फॉर्म भरून घेणे ही प्राथमिक प्रक्रिया ही सुरू नसल्याने ऐन कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या अडचणीच्या काळात सत्ताधारी भाजप शहरातील नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत असून तीन हजार रुपये आमच्या बँक खात्यात कधी जमा करणार का ? लॉकडाऊन उठण्याची वाट पाहताय असा संतप्त सवाल कष्टकरी महिला विचारत आहेत.