राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे हे गोळीबारातुन बचावले

राष्ट्रवादी पक्षाचे
आमदार अण्णा बनसोडे हे गोळीबारातुन बचावले

पिंपरी (प्रतिनिधी )सखी न्युज लाईव्ह
विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे . सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही. ही घटना आज बुधवार (दि.12) दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली .

तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे समजते . आरोपीने पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे . त्याच परिसरात एका व्यक्तीने पिस्तूलातून गोळी झाडली .या घटनेत कुणीही जखमी झाले नाही . घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे . त्याच्याकडून पिस्टूल जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.