पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी पाच जण करोनामुक्त;१२ पैकी ८ जण ठणठणीत बरे
पाच जणांना रविवारी सकाळी नऊ च्या सुमारास डिस्चार्ज देण्यात येणार
पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी पाच जणांची चाचणी ही निगेटिव्ह आली असून त्यांना उद्या (रविवारी) सकाळी नऊ च्या सुमारास डिस्चार्ज देण्यात येणार आहेत. शुक्रवारी तीन जणांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील ऐकून आठ रुग्ण हे ठणठणीत बरे झाले आहेत. शहरात ऐकून १२ करोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर शहरात एक ही रुग्ण आढळलेला नाही.