बातम्या अखिल ब्राह्मण संघ, पुणे आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे 21 बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा पार पडला May 28, 2023May 28, 2023 Editor Sakhi news livesayali kulkarniपुणे : अखिल ब्राह्मण संघ, पुणे आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आज 21 बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा आयोजित करण्यात आला होता.नारायण पेठेतील सोमवंशी आर्य क्षेत्रिय समाज ट्रस्टमध्ये हा सोहळा झाला. उपनयन संस्कार सोहळ्याचे यंदाचे चौथे वर्ष आहे. ग्रॅव्हिटी ग्रुपचे संचालक मिहिर कुलकर्णी यांनी संयोजन केले होते. पंडित वसंतराव गाडगीळ, आमदार रवींद्र धंगेकर, हेमंत रासने, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, रणजीत नातू, अखिल भातीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी उपस्थित होते.गरजू आणि गरजवंत लोकांसाठी गेल्या चार वर्षांपासून हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे. पनवेल, कोल्हापूर, मुंबई, पिंपरी-चिंचवड येथील बटू या उपनयन सोहळ्यात सहभागी झाले होते. लक्ष्मीकांत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी पौरोहित्य केले. गायत्रीमंत्राचा शंखनाद करून उपनयन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. व्रतबंधाचे महत्त्व पंडित वसंतराव गाडगीळ यांनी विशद केले.उपनयन संस्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सचिन टापरे, तेसज फाटक, दिलीप अणवाईकर, गिरीश चव्हाण, सुनील शिरगावकर, संजय कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. Post Views: 204