अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा*

सखी न्यूज लाईव्ह . सायली कुलकर्णी
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने संपुर्ण पुणे जिल्ह्यात 14 ठिकाणी, भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या, वेल्हा ,मुळशी, भोर, शिरूर या तालुक्यामध्ये तसेच पुणे शहरातील वडगाव शेरी, पेठ विभाग, औंध -बाणेर, कोथरूड, हडपसर, पौड रोड, बावधन, सहकारनगर शाखांमध्ये अनेक ठिकाणी भगवान परशुराम पूजन करण्यात आले. वारजे, सिंहगड रोड, बिबवेवाडी शाखा प्रतिनिधीनी इतर शाखांच्या कार्यक्रमात हजेरी लावून ऐक्याचे दर्शन घडवले.

अनेक ठिकाणी भव्य स्वरूपात कार्यक्रम घेण्यात आले, विष्णुसहस्त्रनाम, परशुरामाच्या आरत्या, कीर्तने व त्यावर आधारित व्याख्याने, तसेच समाजप्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. सर्व वयोगटातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष, युवक, युवती यांचा सहभाग होता.

श्री विष्णुचे सहावे अवतार असलेल्या भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सव निमित्त सामाजिक व राष्ट्रीय ऐक्याचा संदेश समाजात देण्यात आला याचे सर्व स्तरात कौतुक होत आहॆ.