बातम्या *चिंचवड विधानसभेत भोईर यांच्या सोबत ज्येष्ठ नागरिक* November 16, 2024 Editor पिंपरी : प्रतिनिधी –सखी न्यूज लाईव्हसायली कुलकर्णीनिवडणुका आता तोंडावर आल्या असून अवघे 5 पाच दिवस राहिले आहेत तर प्रचाराला देखील तीन दिवस बाकी आहेत. महाविकास आघाडी व महायुतीच्या राजकीय नेत्यांच्या सभा आणि प्रचार जोरदार सुरु आहेत. अशातच ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांच्या कपाट चिन्हामुळे मतदार संघात रंगत आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी, सिने कलाकार व जगताप कलाटे यांच्या वरती नाराज असणारे अनेक नागरिक यांनी तिसरा पर्याय म्हणून भाऊसाहेब भोईर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असली तरी असून भोईर यांच्या कपाट चिन्हाच्या प्रचारामुळे निवडणुकाकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात चिंचवड विधानसभा अत्यंत चूरशीची लढत होणार आहे. शहरातील भोसरी मतदारसंघात काटे की टक्कर होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.भाजपचे आमदार अश्विनीताई जगताप यांच्या माघारी मुळे चिंचवड मधून भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांना महायुतीकडून इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांनी पाठिंबा दर्शविला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट चिंचवड विधानसभेचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी रोडशो केला. त्यातच पिंपरी चिंचवड शहरातील रामकृष्ण मोरे यांच्या सोबत काम करणारे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवून नवीन समीकरणे तयार केली आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघ दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. भाजपचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून देखील ओळखला जातो. तर इथे आता कोण निवडून येत याकडे सगळ्याच लक्ष लागून राहिले आहे. Post Views: 23