बातम्या *सायन्स पार्कमध्ये दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन* October 29, 2024October 29, 2024 Editor कर सखी न्यूज लाईव्हसायली कुलकर्णीपिंपरी, पुणे ( दि. २८ ऑक्टोबर २०२४) पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने दिवाळीनिमित्त ‘इसरो – स्पेस ऑन व्हील्स’, पर्यावरण पूरक किल्ले बनवा स्पर्धा, शास्त्रीय गायन, वाचन स्पर्धा आणि सुर नभांगनाचे अशा विविध सांस्कृतिक व वैज्ञानिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायन्स पार्कच्या प्रांगणामध्ये होणारे हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून प्रेक्षक रसिकांनी या सांस्कृतिक मेजवानीस उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे यांनी केले आहे.यामध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी ‘इसरो – स्पेस ऑन व्हील्स’ हे यापूर्वी आयोजित केलेले प्रदर्शन लोक आग्रहास्तव पुन्हा सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) पासून गुरुवार (दि. ३१ ऑक्टोबर) पर्यंत व रविवार (दि. ३ नोव्हेंबर) पासून मंगळवार (दि. ५ नोव्हेंबर) पर्यंत सज्ज राहणार आहे. गुरुवारी (दि. ३१ ऑक्टोबर) ते गुरुवार (दि. ७ नोव्हेंबर) पर्यंत ‘पर्यावरण पूरक किल्ले बनवा स्पर्धा’, गुरुवारी (दि. ३१ ऑक्टोबर) सायंकाळी ५:३० वाजता, मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग व पिंपरी चिंचवड सायन्स पार्क तर्फे विज्ञान व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच प्राजक्ता ठकार यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता होणार आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ ‘अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत’ ही वाचन स्पर्धा रविवारी (दि. ३ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजता, हेमंत मोने लिखित, दिग्दर्शित सुर नभंगनाचे हा सुरेल मैफिली चा कार्यक्रम होणार आहे.शुक्रवारी ( दि. १ नोव्हेंबर) लक्ष्मीपूजन निमित्त प्रदर्शन तसेच सायन्स पार्क व तारांगण बंद राहील. या व्यतिरिक्त दिवाळीच्या सुट्ट्यात नियमित सुरू राहील याची नोंद घ्यावी. Post Views: 7