बातम्या आयुक्त राजेश पाटील यांनी अजित पवारांना दिला दणका April 8, 2021April 8, 2021 Editor आयुक्त राजेश पाटील यांनी अजित पवारांना दिला दणका महापालिका सेवेतून त्यांना केले कार्यमुक्तपिंपरी (प्रतिनिधी सखी न्यूज लाईव्ह)पिंपरी:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी भ्रष्टाचाराविरूद्ध एक पाऊल पुढे टाकले निमित होते अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना महापालिका सेवेतून कार्यमुक्त करणे. अजीत पवार पालिकेत रुजू झाल्यापासून विविध कारणांनी चर्चेत राहिले होते, हीच चर्चा त्यांना आज ( बुधवारी ) महापालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आल्यामुळे झाली . आयुक्त राजेश पाटील यांनी त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश आज घेतला.कोरोना काळात कोविड केअर सेंटरला दिलेल्या जादा बिलांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी महापौर योगेश बहल यांनी केले होते . अजित पवार यांना सेवेतून कार्यमुक्त करताना करोना काळात स्पर्श हाॅस्पिटलमधील भ्रष्टाचार आणि शासनाने नियमित अथवा अतिरिक्त पदभाराबाबत कोणतेच आदेश न दिल्यामुळे आपण कार्यमुक्त करत असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात म्हटले आहे .तसेच त्यांचे सर्व आर्थिक अधिकारही काढून घेण्यात आले .24 जुलै 2019 रोजी पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्यात आली होती . ही नेमणूक दोन वर्षे कालावधीसाठी होती . 5 सप्टेंबर 2019 रोजी ते महापालिकेत रूजू झाले होते . 19 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी विविध निर्णय घेतले.कोरोना महामारीत फिल्डवर्क करत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली .मात्र कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नसताना स्पर्श हॉस्पिटलला पवार यांच्या आदेशावरून 3 कोटी 14 लाख रुपयांची बिले अदा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला . तसेच त्यांच्या कार्यशैलीवर आणि नेमणुकीवर विविध आक्षेप घेण्यात आले . या पार्श्वभुमीवर आयुक्त राजेश पाटील यांनी पवार यांना महापालिका सेवेतून आज कार्यमुक्त केले . Post Views: 1,676