महापौर माई ढोरे कर्तबगार महिला महापौर!

महापौर माई ढोरे कर्तबगार महिला महापौर!

पिंपरी (सखी न्युज लाईव्ह प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे अशा काळात ही पिंपरी चिंचवडच्या कर्तबगार महापौर माई ढोरे वयाची साठी पार केली असतानाही तरुणींना ही मागे टाकतील अशा प्रकारच्या कोरोनाच्या काळात शहराची काळजी घेताना दिसत आहेत.त्यांनी चक्क झाशीची राणीचे रूप घेऊन कोवीड सेंटरला भेटी देऊन कोरोनाच्या रुग्णांना मानसिक आधार देण्याचे मोठे काम त्या करीत आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सत्ताधारी पक्षनेते श्री.नामदेव ढाके,स्थायी समिती अध्यक्ष श्री.नितिन लांडगे यांनी जंम्बो कोव्हीड सेंटर व ॲटोकस्टर येथील कोरोना केअर सेंटर ला भेट देऊन पाहणी केली.
कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांचा योग्य प्रकारे उपचार होतो का?त्यांच्या काही अडचणी आहेत का? याची कोरोना केअर सेंटरमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊन रूग्णाची विचारपुस करण्यात आली व त्यांना धीर देण्याचे काम केले. तुम्ही लवकरच बरे होऊन तुमच्या घरी जाऊन घरच्यांबरोबर आनंद साजरा करा असे आश्वासक बोलून त्यांनी आधार देण्याचे काम महापौर सौ.माई ढोरे यांनी केले.
ऑक्सिजन बेड, व्हेटिलेटर बेड,रेमडीसिविर इंजेक्शन यांची रूग्णांना योग्य प्रकारे व्यवस्था होत आहे का? याची माहीती घेऊन,तेथील मॅनेजमेंट व डॉक्टर्स व कर्मचारी यांना महामारीच्या काळात तुम्ही खूप चांगले काम करीत आहात असे बोलून त्याचे कौतुक करून सर्वाना प्रोत्साहन दिले.

कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या परिस्थितीत अनेक लोकप्रतिनिधी घरात किंवा फार्म हाऊस सारख्या सुरक्षित ठिकाणी कुटुंबासह राहतात मात्र महापौर माई ढोरे या गेल्या वर्षांपासून कोरोना काळात एक दिवसही घरी न थांबता शहरातील नागरिकांची काळजी घेताना दिसतात त्यामुळे त्यांच्याकडे एक कर्तबगार महिला महापौर म्हणून पाहिले जाते.