शहराचे विकासपुरुष म्हणून अजितदादा यांच्याकडे पाहिले जाते त्यामुळे समांतर पुलाचे भुमिपुजन दादांच्या हस्तेच करावे (उषा वाघीरे)

प्रतिनिधी, 23 डिसेंबर – पिंपरी चिंचवड sakhi news live.com महानगरपालिकेच्या वतीने पवना नदीवर उभारण्यात येणाऱ्या पिंपरी गाव व पिंपळे सौदागर गावांना जोडणारा समांतर पुलाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करावे अशी आग्रही मागणी पिंपरी गावच्या नगरसेविका उषा संजोग वाघेरे पाटील यांनी मागणी महापौर उषामाई ढोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरीगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी कॅम्प भागातील नागरिकांना या पुलामुळे वाहतुकीचा प्रश्न निकाली निघणार आहे. काही दिवसापासून वर्षापासून पिंपरीगाव व पिंपळे सौदागर परिसराला जोडणाऱ्या पुलाला एक समांतर पूल उभारावा यासाठी सातत्याने मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व नगरसेेविका उषा वाघेरे यांच्याकडून सुरू होते. या प्रयत्नांना यश म्हणून समांतर पुलाच्या कामाला नुकतीच परवानगी देण्यात आली आहे. या पुलामुळे या भागातील हजारो नागरिकांची वाहतुकीची समस्या सुटणार आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात व जडणघडणीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. शहराचे विकासपुरुष म्हणून अजितदादा यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या हस्ते पिंपरीगाव व पिंपळे सौदागर परिसराला जोडणाऱ्या समांतर पुलाचे उदघाटन व्हावे असे अशी पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशांची इच्छा आहे. त्यामुळे पालकमंत्री अजितदादा पवार यांंची वेळ घेऊन उदघाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे असे मागणी वाघेरेे यांनी केली आहे.