महिला दिनानिमित्त “धैर्यगाथा” विशेषांकाचे महापौरांच्या हस्ते प्रकाशन!

पिंपरी (प्रतिनिधी)
साप्ताहिक माझी सखी सोबतीच्या वतीने महिला दिनानिमित्त “धैर्यगाथा “विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच पिंपरी चिंचवड महापौर माई ढोरे यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले यावेळी अनेक नगरसेविका,महिला पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारती मधील महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या कार्यालयात साप्ताहिक माझी सखी सोबतीच्या वतीने प्रकाशित झालेल्या विशेष अंकात डॉक्टर, शासकीय अधिकारी,राजकारणी,सामाजिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या महिलांच्या मुलाखती प्रकाशित करण्यात आल्या असून अंकाची मांडणी व सजावट आकर्षक आहे.
महापौर माई ढोरे यांनी “धैर्यगाथा” विशेषांकाची स्तुती केली असून महिला दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या “धैर्यगाथा”या विशेषांकाच्या संपादिका सायली विनय कुलकर्णी यांनी खूप छान मेहनत घेतली असून अंकाची मांडणी व डिझाईन आकर्षक असून प्रत्येक महिला भगिनींकडे हा अंक संग्रही असणे आवश्यक असून अंकातील प्रत्येक लेख महिलांना प्रेरणा देणारे असल्याचे माईनी सांगितले.