पिंपरी महानगरपालिकेचा अजब कारभार !

पिंपरी महानगरपालिकेचा अजब कारभार !
पिंपरी चिंचवड महापालिकेने वाढवली नदीची लांबी रूदी
पिंपरी प्रतिनिधी (सखी न्युज लाईव्ह) सायली कुलकर्णी
:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी भ्रष्टाचाराबद्दल अधिक संशोधन करून नदीची लांबी वाढवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पर्यावर संतुलित राखण्यासाठी नदी महत्त्वाची मानली जाते. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरण नियंत्रण करणाऱ्या पवना आणि ईद्रायणी नदीची लांबी रूंदी वाढवून एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते किशोर तेलंग यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्व. दत्ता काका साने प्रतिष्ठाण वतीने दिलेल्या निवेदनात तेलंग यांनी म्हटले आहे की, स्मार्ट पिंपरी चिंचवड मनपाचे स्मार्ट आयुक्त म्हणजेच स्मार्ट भ्रष्ट अधिकारी, ठेकेदार व नेतेमंडळी हिंतचिंतक आहात अशी शहरवासीयांमध्ये खुलेआम चर्चा असताना आज शहरात पुणे
प्रमाणे कुठलेही गाव समाविष्ट नसताना अचानकपणे पवना व इंद्रायणी नदीचे प्रत्येकी 5 ते 7 कि.मी. लांबी वाढविले आहे यामुळे सल्लागाराला 1कोटी 25 लाख रूपयांस मान्यतामिळावी असे स्थायी समितीच्या विषय मांडला आहे. हा एकप्रकारे करदात्यांच्या तिजोरीवर नेहमीप्रमाणे कागदोपत्री भ्रष्ट व चुकीचे कारभार करीत करोडो रूपयांवर डल्ला टाकण्याचा प्रकार आहे. व शहरवासीयांना नदीचे लांबी वाढविण्याचे आमिष दाखवुन उल्लुबनविण्यासारखे होईल.
आजपर्यंत आपण भ्रष्ट व चुकीच्या कारभार करणा-या लोकांमागे भक्कमपणे पाठीशी उभे राहिल्यामुळे करदात्यांचे हजारो कोटीचे या अगोदर नुकसान झाले आहे. यास साक्षीदार शहरातील 25 लाख शहर वासीय आहेत. त्यात ही महाविकास आघाडी सरकार आले असताना देखील आपली बदली न होणे म्हणजेच दाल में… कुछ तो काला है…. अशीच चर्चा रंगली आहे. आपण आजही आपली बदली जवळ आली असताना नदीचे लांबी वाढवुन म्हणजेच जे शक्य नाही ते काम करून मर्जीतील सल्लागारांवर 1 कोटी 25 लाख रूपयांचे उधळपट्टी करीत हितचिंतकांचे भले केल्याबाबत व मी यापुर्वी अनेक चुकीच्या व भ्रष्ट काभाराचे पुराव्यासह तक्रारी करून देखील संबंधित भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांना अभय दिल्याबद्दल व बोगस एफडीआर ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल न केल्याबद्दल आपणांस शुभेच्छा असेही या निवेदनात म्हटले आहे.