Sunday, May 3, 2026
Latest:
बातम्या

पिंपरी-चिंचवडसाठी पाटलांचे योगदान काय? विरोधी पक्षनेते राजु मिसाळ

(सत्ताधार्यांना पहिल्या पासुनच अजित दादांची अॅलर्जी)
प्रतिनिधी–
(सखी न्युज लाईव्ह)
चंद्रकांत दादांचे पिंपरी-चिंचवडसाठी योगदान काय? विरोधी पक्षनेते राजु मिसाळ

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत च–होली , रावेत , बो-हाडेवस्ती येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या अभियानाचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील (इडब्ल्यूएस) नागरिकांसाठी परवडण्या योग्य अशा घरांची निर्मिती केली आहे.

या योजनेची सोडत आज (सोमवार) दुपारी तीन वाजता चिंचवड येथील प्रा रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये आमदार तथा माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होती. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाटलांचेयोगदान काय आहे? असा सवाल करत माञ विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी घेतलेल्या आक्रमक पणामुळे आजची घरकुल सोडत रद्द झाली