Coronavirus: भारतातील परिस्थिती वेगळी; सरकारनं संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा वेगळी पावलं उचलावी – राहुल गांधी

करोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या काही प्रश्नांबाबत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून काही गोष्टी सुचवल्या आहेत.

देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून तो रोखण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आलं आहे. मात्र, यामुळे अनेक नव्य समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर मात करण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून काही गोष्टी सुचवल्या आहेत. भारतात इतर देशांपेक्षा वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा सरकारनं वेगळी पावलं उचलायला हवीत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या संकटसमयी आम्ही सरकारच्यासोबत आहोत. सरकारसोबत राहून आम्ही या आव्हानाचा सामना करु, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.