*पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना दोन समितीचे सदस्यत्व जाहिर*
Sakhinewslive
पिंपरी प्रतिनिधी !राज्यात कोरोना महामारीने कहर केल्याने राज्यात अनेक दिवस लॉकडाऊन जाहीर करावे लागले होते.याचा फटका राजकीय व्यक्तींना बसला आहे. विधिमंडळ समितीनाही बसला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या विधिमंडळ समित्या वर्षभरानंतर नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत,
पिंपरी-चिंचवड शहरामधील तीन आमदारांपैकी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना दोन समितीचे सदस्यत्व मिळाले आहे. शहरातील भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार तथा पिंपरी-चिंचवड भाजपाचे अध्यक्ष महेश लांडगे यांची प्रत्येकी एका समितीवर सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. त्याचबरोबर मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना दोन समितीवर सदस्य पद मिळाले आहे.
आमदार बनसोडे यांना सर्वाधिक महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीचे सदस्यत्व देण्यात आले असून यांना ग्रंथालय समितीवरही घेण्यात आले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांना उपविधान समिती तर आमदार महेश लांडगे यांना सार्वजनिक उपक्रम समिती देण्यात आली आहे. मावळमधून प्रथमच निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना दोन समित्या मिळाले आहेत.एडस रोगाला प्रभावी प्रतिबंध घालण्यासाठीच्या फोरम तथा समितीसह विशेषाधिकार समितीवरही त्यांना घेण्यात आले आहे