पाच रुपयांत पाच किलोमीटर पीएमपीचा प्रवास
SAKHI NEWS LIVE:-
सार्वजनिक वाहतुकीला चालना; दसऱ्यापासून योजनेला प्रारंभ
पुणे : सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्याच्या दृष्टीने ‘पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटर’चा प्रवास ही योजना पीएमपीकडून हाती घेण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा मध्यभाग निश्चित करून नऊ मार्गावर पाच किलोमीटर लांबीच्या परिघात प्रवाशांना पाच रुपयात प्रवास करता येणार आहे. या योजनेला ‘अटल प्रवासी योजना’ असे नाव देण्यात आले असून दसऱ्याच्या मुहूर्तापासून या योजनेची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली.
महापौर मुरलीधर मोहोळ आणि पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी ही घोषणा पत्रकार परिषदेत के ली. शहरातील कमी अंतराच्या मार्गावर प्रवासासाठी पीएमपीकडून फिडर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रवाशांना पाच किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवास पाच रुपयांमध्ये करता येणार आहे. दर पाच मिनिटाला एक अशी या गाडय़ांची वारंवारिता असेल, असे मोहोळ यांनी सांगितले.
स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर, पूलगेट, पुणे रेल्वे स्थानक, महापालिका भवन या महत्त्वाच्या स्थानकासह उपनगरातील कात्रज, हडपसर, निगडी, कोथरूड, भोसरीसह एकू ण १२ आगारातून ५३ मार्गावर फिडर सेवा दिली जाणार आहे. या सेवेसाठी मध्यम आकाराच्या (मिडी बस) गाडय़ांचा वापर के ला जाईल. एकू ण १८० गाडय़ा या मार्गावर धावणार आहेत. त्यासाठी कमी उत्पन्न असलेल्या मार्गावरील गाडय़ा कमी करण्यात आल्या आहेत. मात्र त्यामुळे प्रवाशांची कोणतीही अडचण होणार नाही, असे डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
स्वारगेट स्थानकावरून चार मार्गावर, नरवीर तानाजी वाडी येथून सात मार्गावर, कोथरूड डेपो येथून दोन मार्ग तर कात्रज, देहू, हडपसर येथून सहा, पुणे रेल्वे स्थानक परिसरातून एक, निगडी येथील पाच, भोसरी आणि पिंपरी येथील प्रत्येकी चार मार्ग तर भेकराईनगर आगारातूून दोन मार्गावर सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अटल योजना
अटल प्रवासी योजना म्हणजे लांब पल्ल्याच्या गाडय़ांपर्यंत प्रवासी नेण्याची पूरक योजना आहे. ‘अलायनिंग ट्रान्झिट ऑन ऑल लेन्स’ असे या योजनेचे नाव आहे. त्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा मध्यभाग निश्चित करण्यात येणार आहे. या भागातून लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या स्थानकापर्यंत मिडी गाडय़ातून प्रवाशांची वाहतूक करण्यात येईल.
३७ नवे मार्ग
पीएमपी प्रशासनाकडून ३७ नवे मार्ग सुरू करण्यात आले आहेत. प्रवाशांचे अभिप्राय, अपेक्षित उत्पन्नाचा विचार करून हे मार्ग सुरू करण्यात आले आहेत. अटल प्रवासी योजनेबरोबरच दसऱ्यापासून नव्या मार्गावर पीएमपी धावणार आहे. त्यामुळे पीएमपीची प्रवासी संख्या वाढेल, असा दावा करण्यात आला आहे.
पीएमपीचे अॅप
महापालिके च्या पीएमसी के अर या अॅपच्या धर्तीवर पीएमपीनेही पीएमपीएमएल के अर हे अॅप तयार के ले आहे. तक्रारी, सूचना या अॅपद्वारे नोंदविता येणार आहेत. फे सबुक, ट्वीटरवरही प्रवाशांना तक्रारी, सूचना करता येणार आहेत.