पिंपरी चिंचवडबातम्या

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी

पिंपरी-चिंचवड, दि. ४ नोव्हेबर : महानगरपालिकेच्या मा. स्थायी समितीची साप्ताहिक सभा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली आज महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात संपन्न झाली. या सभेत विविध विभागांशी संबंधित विकासकामे, क्रीडा, आरोग्य सेवा, रस्ते, नागरी सुविधा तसेच पायाभूत सुविधांच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विभाग

कु. प्रांशु सदाशिव सूर्यवंशी या खेळाडूला इजिप्त येथे आयोजित ‘Junior World Cup’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महानगरपालिकेच्या क्रीडा धोरणानुसार प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास व भोजनासाठी आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले.

साजिद करीम तांबोळी व अन्वर मुक्तार अन्सारी या खेळाडूंना सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महानगरपालिकेच्या क्रीडा धोरणानुसार आर्थिक साहाय्य व क्रीडा शिष्यवृत्ती देण्यास मान्यता देण्यात आली.

प्रणीत गणेश आढाव या खेळाडूला हाँगकाँग येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तर स्नेहा एस. कमलदिन्नी हिला आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महानगरपालिकेच्या क्रीडा धोरणानुसार आर्थिक साहाय्य देण्यास मंजुरी देण्यात आली.

प्रगती गायकवाड या खेळाडूच्या क्रीडा प्रमाणपत्राची क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ‘हिंद केसरी’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धोरणानुसार आर्थिक साहाय्य देण्यास मंजुरी देण्यात आली.

आरोग्य व शैक्षणिक पायाभूत सुविधा

महानगरपालिकेच्या रुग्णालयांसाठी अत्याधुनिक वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी GeM पोर्टलवर प्राप्त निविदेला मंजुरी देण्यात आली.

महानगरपालिका कार्यक्षेत्रात सीएसआर व सीइआरउपक्रम राबविण्यासाठी नियुक्त ‘Individual Consultant’ यांच्या नेमणुकीस पुढील कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास तसेच करारास मंजुरी देण्यात आली.

नागरी सेवा (UPSC) परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी सावित्रीबाई फुले अकादमी (वाकड) येथील संचालक पदावर करार पद्धतीने पुढील कालावधीकरिता मुदतवाढ देण्यास व मासिक मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली.

नागरी सुधारणा व स्थापत्य विकासकामे

प्रभाग क्रमांक १० मधील एम्पायर इस्टेट नाल्याच्या दुरुस्तीविषयक कामांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ५ मधील रस्त्यांवरील ट्रेंचेस व चर डब्लुबीएम, बीसी आणि कोल्ड मिक्स पद्धतीने दुरुस्त करण्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ३ मधील चऱ्होली, वडमुखवाडी व चोविसावाडी येथील महानगरपालिका इमारती व स्वच्छतागृहांची दुरुस्ती, स्टॉर्म वॉटर लाईन व चेंबरची दुरुस्ती तसेच सेवा वाहिन्यांसाठी खोदलेले चर दुरुस्त करण्याच्या निविदांना मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ३ मधील चऱ्होली परिसरात आवश्यक ठिकाणी स्थापत्यविषयक दुरुस्ती व देखभालीची कामे करण्यास तसेच मोशी, डुडुळगाव व इतर परिसरातील स्थापत्यविषयक कामांच्या दुरुस्तीच्या निविदांना मंजुरी देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ९ मधील खराळवाडी, कामगारनगर तसेच यशवंतनगर, उद्यमनगर व इतर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या निविदांना मंजुरी देण्यात आली.

नागरी सुविधा व प्रभाग विकासकामे

‘ब’ प्रभागांतर्गत गणपती विसर्जन सोहळा व इतर महानगरपालिका कार्यक्रमांसाठी आवश्यक मंडप व्यवस्था करण्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.

प्रभाग क्रमांक १७ मधील विविध भागांत आवश्यकतेनुसार स्थापत्यविषयक दुरुस्तीची कामे करण्यास तसेच प्रेमलोक पार्क, दळवीनगर व इंदिरानगर परिसरातील उर्वरित डांबरी रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने दुरुस्ती करण्याच्या निविदांना मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक १ मधील चिखली येथील मोरेवस्ती परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अहवालानुसार सुधारणा करण्यास तसेच आवश्यक ठिकाणी स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे व इतर अनुषंगिक कामांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली.

चिखली सेक्टर क्रमांक १७ व १९ येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या (EWS) गृहप्रकल्पातील उर्वरित सीमाभिंत बांधण्याच्या कामास तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत इमारतीतील उर्वरित दुरुस्तीची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली.

आरोग्य विभागामार्फत शहरातील १०० गणेश विसर्जन स्थळांवर निर्माल्य संकलनासाठी कलश खरेदी व वितरणाच्या आदेशाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.

जुनी सांगवी येथील इंद्रप्रस्थजवळील नाल्याच्या प्रवाहाची दिशा बदलणे व घाट परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.

‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध विद्युतविषयक कामांसाठी कुशल व अकुशल कर्मचारी पुरविणे व अनुषंगिक कामे करण्याच्या निविदेला मान्यता देण्यात आली.

प्रभागनिहाय रस्ते व स्टॉर्म वॉटर कामे

प्रभाग क्रमांक १२ मध्ये रोड फर्निचर, नामफलक बसविणे, पेव्हिंग ब्लॉक दुरुस्ती, पाथवे काँक्रिटीकरण तसेच तळवडे स्मशानभूमीची स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्ती करण्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.

प्रभाग क्रमांक १ मधील चिखली परिसरातील विविध रस्त्यांची अहवालानुसार सुधारणा करण्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ६ मधील धावडेवस्ती, गुळवेवस्ती, भगतवस्ती व परिसरातील रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्याच्या निविदेला मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ६ मधील चक्रपाणी वसाहत, सद्गुरुनगर, लांडगेवस्ती व परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यास तसेच देवकरवस्ती, महादेवनगर व परिसरातील रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्याच्या निविदांना मंजुरी देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ६ मधील चक्रपाणी वसाहत, सद्गुरुनगर, लांडगेवस्ती व परिसरातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीविषयक कामांच्या निविदेलाही मंजुरी देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ८ मधील सेक्टर क्रमांक ३, ४, ६, जलवायु विहार सोसायटी, डिस्ट्रिक्ट सेंटर व इतर परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याच्या निविदेला मान्यता देण्यात आली.

आरोग्य सेवा, तांत्रिक दुरुस्ती व जलवाहिनी महाप्रकल्प

नवीन भोसरी व जिजामाता रुग्णालयातील NBEMS-DNB अभ्यासक्रमाच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांसाठी ७८ प्रकारची वैद्यकीय पुस्तके थेट पद्धतीने तातडीने खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली.

मुख्य लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या विनंती अर्जानुसार प्रपत्र ‘अ’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे रजा मंजुरीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

जिजामाता रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागातील ‘किरण सी आर्म व एक्स-रे मशीनचे निकामी झालेले सॉफ्टवेअर बदलून यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्यास मंजुरी देण्यात आली.

सन २०२१ मध्ये मंजूर झालेल्या निविदेअंतर्गत शहरात ‘ब्रांझचे म्युरल्स, पुतळे व संबंधित कलाकृती तयार करण्याच्या कामात धातूच्या दरातील वाढीमुळे निर्माण झालेल्या फरकाची रक्कम निश्चित करून मान्यता देण्यास शिफारस करण्यात आली.

डांगे चौक ते आदित्य बिर्ला हॉस्पिटल मार्गावरील फूटपाथवरील डेकोरेटिव्ह पोलकरिता नवीन वीजमीटर बसवून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या प्रशासकीय खर्चाचे अवलोकन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक १५ मधील निगडी प्राधिकरण व इतर परिसरात आवश्यकतेनुसार मंडपविषयक कामे करण्याच्या निविदेला मान्यता देण्यात आली.