‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी

SAKHI NEWS LIVE:-

सिंधू ही एक कौटुंबिक मालिका आहे. सध्या ZEE5 वर या मालिकेचे भाग प्रसारित होत आहेत. या मालिकेला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मुलीची ही गोष्ट आहे. शिक्षण घेण्यासाठी सिंधू ही मुलगी कसा संघर्ष करते हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. पूर्वी बालविवाह होत. बालविवाह झाल्यानंतरही सिंधू शिक्षण घेण्यासाठी कसे प्रयत्न करते यावर ही मालिका आधारीत आहे.

सिंधूकडून या सात गोष्टी प्रत्येक स्त्रीने शिकण्यासारख्या आहेत

ध्येयवेडी सिंधू
सिंधूचं लग्न देवव्रत रानडे या मुलाशी होतं. तो एका सधन कुटुंबातला मुलगा आहे. लग्न झाल्यानंतरही सिंधूला पुढे शिकायचं आहे. ती तिच्या सासरच्या घरात असलेल्या महिलांनाही शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगते. शिकण्याचं ध्येय सोडत नाही

ऐका तुमच्या मनाचं
सिंधूचं लग्न जेव्हा एका प्रौढ माणसाशी लावण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ती पळ काढते. ती तिच्या मनाची हाक ऐकते. तिला ठाऊक असतं की आपण करतो आहे ते योग्य आहे

अनुभवांमधून शिका
सिंधू शिक्षणासाठी स्वतःच्या कुटुंबाशी संघर्ष करते. तिचं कौशल्य आणि शिक्षणाप्रति असलेला ओढा पाहून तिचे सासरे मार्तंड शास्त्री संमती पुन्हा प्रवेश घेण्याची समती देतात. लग्न होऊनही सिंधू तिचं शिक्षण थांबवत शिक्षणाप्रती.

नव्या गोष्टी शिकणं
सिंधू ही अत्यंत हुशार आणि चाणाक्ष मुलगी आहे. ती फक्त स्वतःच शिकते असं नाही, सासरकडच्या प्रौढ स्त्रियांनाही शिकवते. नव्या गोष्टी शिकण्याची आणि शिकवण्याची तिची तयारी आहे

तुमच्या हक्कांसाठी उभे राहा
सिंधू तिच्या हक्कांसाठी ठामपणे उभी राहते. कोणत्याही परिस्थितीत डगमगून जात नाही. आपली स्वप्नं आपल्याला जगवतात यावर तिचा ठाम विश्वास आहे.अनिष्ट प्रथा अमान्य करा
सिंधू ही एक आदर्श मुलगी दाखवण्यात आली आहे. तिला जातीभेद, स्त्री-पुरुष असमानता आणि बालविवाह या तिन्ही प्रथा मान्य नाहीत. एवढंच नाही तर याच मालिकेत जे अण्णा नावाचं पात्र आहे त्यांची बहीणही सिंधूसारखीच आहे. अण्णांच्या बहिणीने आयुष्यभर लग्न केलेलं नाही. तिला समाजाकडून याबाबत टोमणे ऐकावे लागले मात्र तिने याची पर्वा केलेली नाही. ज्या महिलांवर समाजात अन्याय केला जातो त्यांच्यासाठी ती आधार झाली आहे.सिंधूने जे स्वातंत्र्यपूर्व काळात केलं त्यावर आधारित ही मालिका आहे. या मालिकेला चांगला प्रतिसादही मिळतो आहे तेव्हा तुमची आवडती मालिका सिंधू पाहा आता ZEE5 वर