पुणेबातम्या

आता स्पर्धा परीक्षार्थी आक्रमक… पुण्यात मोर्चा!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात स्पर्धा परीक्षार्थ्यांचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

ओंकारेश्वर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोर्चा काढण्यात आला आहे. हजारो स्पर्धा परीक्षार्थी सरकारवर टीका करणारे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले आहेत. या गैरप्रकाराच्या अनुषंगाने एमपीएससी अध्यक्ष, सचिवांनी राजीनामा द्यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.