३८ व्या पुणे फेस्टिव्हल तर्फे आयोजितकलावंतांच्या मेळाव्यास मोठा प्रतिसाद
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची विशेष उपस्थिती

पुणे फेस्टिव्हल या पुण्याचे नाव जगभर नेणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाची उंची अधिक वाढेल हा विश्वास मला आहे. या दृष्टीने पुणे फेस्टिव्हलच्या अॅडव्हायजरी कमिटीच्या चेअरमनपदी माझी निवड झाली, या पदास मी निश्चित न्याय देईन. पुणे फेस्टिव्हलची अनेक वैशिष्ट्ये असून अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी या प्रदीर्घ काळ पुणे फेस्टिव्हल मध्ये आपला नृत्याविष्कार सादर करतात, असे वैशिष्ट्य कोणत्याच महोत्सवात दिसणार नाही. पुणे फेस्टिव्हलचे सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यात वर्षभर होत रहावेत, तसेच कोल्हापूरला प्रकाशझोतात नसणारी ८४ स्थळे शोधून ती बघण्याचा विशेष कार्यक्रम कोल्हापूरला केला होता तसाच प्रयत्न पुण्यातील प्रकाशझोतात नसणारी स्थळे शोधून ती बघण्याची सुविधा निर्माण व्हावी असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पुणे फेस्टिव्हल अॅडव्हायजरी कमिटीचे चेरमन चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांच्या निधनानंतर पुणे फेस्टिव्हल संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल प्राईड येथे पुण्यातील कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष सुभाष सणस, सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, बालगंधर्व कार्यक्रम प्रमुख व विश्वस्त मोहन टिल्लू यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर व सत्यशील देशपांडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
पुण्यातील नामवंत कलावंत, शिक्षण तज्ञ, साहित्यिक, कवी, कार्यक्रमांचे संयोजक या बैठकीत मोठ्या संखेने सहभागी झाले होते. पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, शाम भुरके, सुचेता भिडे चापेकर, स्वाती दैठणकर, राहुल सोलापूरकर, शारंगधर साठे, राजेंद्र बर्वे, डॉ. संगीता बर्वे, हमेंत मावळे, वीरेंद्र चित्राव, राजीव बर्वे, प्रदीप निफाडकर, रघुनंदन पणशीकर, अनुराधा राजहंस, चारुशीला केळकर, सुचेता अवचट, जया जोग, पुष्कर देशपांडे, ऋषिकेश देशपांडे, आभा आवटी, विजय मागीकर, सुनील महाजन, मिलिंद तुळणकर, डॉ. देविका बोरठाकुर, सचिन हिंगणेकर, निकिता मोघे, शुभांगी दामले, सत्यशील देशपांडे, नीलिमा राडकर, धनंजय गोखले, यांसह ५० हून अधिक कलावंत यात सहभागी झाले होते.
प्रारंभी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सर्वांचे स्वागत केले व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे फेस्टिव्हलच्या अॅडव्हायजरी कमिटीच्या चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, ‘संस्थापक अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या निधनानंतर होणारा यंदाचा ३८ वा पुणे फेस्टिव्हल तेवढाच आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. गायन, वादन, नृत्य, संगीत, कला आणि क्रीडा यातील जुने व नवे कार्यक्रम सादर करून पुणे फेस्टिव्हलची उंची कायम राखली जाईल. नवीन कलावंत नव्या कल्पनांसह सहभागी होत आहेत ही आनंदाची बाब आहे. श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच, बालगंधर्व रंगमंदिर व कलादालन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि विविध क्रीडा स्पर्धा यांच्या ठिकाणी पुणे फेस्टिव्हल साजरा होईल. आत्तापर्यंत साऱ्या महाराष्ट्रातून तीनशेहून अधिक अर्ज आले असून त्यातील उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रम पुणे फेस्टिव्हलमध्ये सादर होतील अशी ग्वाही त्यांनी दिली.
पुणे फेस्टिव्हल हा सांस्कृतिक महोत्सव आपला प्रत्येकाचा असून नवीन कलावंतांना त्यात सहभागी होता यावे यासाठी हा कलावंतांचा मेळावा असल्याचे सांगून पुणे फेस्टिव्हलचे सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई म्हणाले की, ‘कलावंतांनी आपले अथवा इतरांचे कार्यक्रम, त्यांची रूपरेखा इत्यादी तपशील लेखी स्वरुपात द्यावे. सर्वोत्तम कार्यक्रम निवडले जातील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला’.
पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी शुभेच्छा देऊन म्हंटले की, ‘पुणे फेस्टिव्हलची नवी टीम चांगल्या दर्जाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून या महोत्सवाची उंची निश्चित वाढवतील.’
कलावंतांच्या मेळाव्यात अनेक कार्यक्रम सुचवले गेले. मराठी कवींचा मुशायरा, ज्येष्ठ गायिका मालती पांडे सुगम संगीत कार्यक्रम, संगीत नाटक प्रयोग, साहित्यिक शंकर पाटील, ग. दि. माडगुळकर, द. मा. मिराजदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रम, अशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांची गाणी, ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा आणि संगीतकार यशवंत देव यांच्या जन्मशताब्दी निमित्तचा कार्यक्रम, सुमुह गायन स्पर्धा, मंगळागौरीच्या खेळांवर आधारित ‘गौराई खेला’ कार्यक्रम, शिववंदना, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वतःच्या कला पथकातील गाण्यांचा कार्यक्रम, वंदे मातरम या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्त विशेष कार्यक्रम, रोटरी व रोट्रॅक्ट तर्फे जेन-झी रॉक कार्यक्रम, जपानी नाटक, अभिजात नृत्य, ऐतिहासिक स्थळांचा दृक-श्राव्य कार्यक्रम, ययाती नाट्यप्रवेश, पुण्याचा संदर्भ असणारे मराठी व हिंदी जुने चित्रपट, भजने आणि भजनी मंडळांच्या स्पर्धा, मा. दिवाकर यांच्या नाट्यछटा याबरोबरच तरुणांच्या अपेक्षांचा वेध घेणारे व जेन-झींचा मोठा सहभाग असणारे कार्यक्रम, परंपरागत आरत्या, बालनाट्य, ढोल, लेझीम पथके स्पर्धा, शाहीर पोवाडे महोत्सव, छत्रपती शिवाजी महाराजांवरील कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम कलावंतांच्या मेळाव्यात सुचवले गेले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी धामणकर यांनी केले. स्नेहभोजनानंतर या मेळाव्याची सांगता झाली.
३८ व्या पुणे फेस्टिव्हल तर्फे आयोजित कलावंतांच्या मेळाव्यात ज्येष्ठ कलावंत सत्यशील देशपांडे यांचा विशेष सत्कार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई व अध्यक्ष कृष्णकुमार गोयल
