आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी भक्ती-शक्ती चौक परिसरात वाहतूक बदल
सायंकाळी ४ ते रात्री ९ दरम्यान काही मार्ग बंद; नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड, दि. ३१ जुलै : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) भक्ती-शक्ती शिल्प परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत.
पोलीस उपायुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार ही अधिसूचना जारी केली आहे.
वाहतूक बदलाची माहिती
दिनांक : १ ऑगस्ट २०२६
वेळ : सायंकाळी ४.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत
बंद राहणारा मार्ग :
जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पुणागेट हॉटेलसमोरील मर्ज-आऊट येथून भक्ती-शक्ती चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग :
वाहनचालकांनी सेंट्रल चौक – भक्ती-शक्ती ओव्हरब्रिज – रुद्रा पार्किंग मार्गे आपल्या इच्छित स्थळी जावे.
या कालावधीत अत्यावश्यक सेवा वाहनांना वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांवर आवश्यकतेनुसार निर्बंध लागू राहतील.
वाहतूक शाखेने नागरिक आणि वाहनचालकांना सहकार्य करण्याचे तसेच वाहतूक पोलिसांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सुरक्षित व सुरळीत वाहतुकीस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे
