*हिंदू म्हणून काम करत राहावे जेष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे आवाहन*

.
पिपरी प्रतिनिधी
सखी न्युज लाइवं
सायली कुलकर्णी
सुसंकृत, सुसंस्कारित व राष्ट्र हितासाठी सर्वाना उभे करणे हे आपले कर्तव्य आहे ,ब्राह्मण हि माझ्यासाठी जात नसून एक आदर्श वृत्ती, एक संस्कृती आहे आणि म्हणून आपण हिंदू म्हणून काम करत राहणं असे आव्हान जेष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृह येथे आयोजित ब्राह्मण सामर्थ्य संमेलनातं “ब्राह्मण समाजाचे सामर्थ्य” या विषयावर बोलतानां केले.
पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृह येथे नुकतेच ब्राह्मण सामर्थ्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते ,या प्रसंगी भावेनजी पाठक, कुणाल टिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.संमेलनात राहुल सोलापूरकर यांनी “ब्राह्मण समाजाचे सामर्थ्य” या विषयावर विचार मांडले, तर विशेष वक्ते सात्यकी सावरकर यांनी “हिंदुत्व” या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात मंत्रपुष्पांजलीने करून श्री. वसंतराव गाडगीळ यांच्या अलीकडील निधनाबद्दल त्यांना या प्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली
जेष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर पुढे म्हणाले कि कृत,कारिता आणि अनुदित या महत्वाच्या तत्वांन वर ब्राम्हण समाज काम करतोय ,समाजातील सर्व क्षेत्रात समाज कार्यरत आहे. दुरदैवाने गांधी हत्ये नंतर जे काही अत्याचार सहन करावे लागले त्या मुळे ब्राह्मण समाज अत्यंत कोशात गेला ,मूळ कर्तव्य विसरला आजची पिढी तर आपण शिकूया व परदेशात जाऊया या मानसिकतेत असल्याचे दिसून येते.
संमेलनात सात्यकी सावरकर यांनी “हिंदुत्व” या विषयावर मार्गदर्शन करतांना “गेल्या काही वर्षातील किंवा शतकातील हिंदू विरोधी घटना बघता आता हिंदूंनी जाती मोडून एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले . “बटोगे तो कटोगे” हे योगी आदित्यनाथ यांचे विधान लक्षात घ्यावे.”हिंदू या शब्दाची व्याख्या सांगून पुढे ते म्हणाले, “सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे हिंदूंचे बंधुत्व आहे. समान रक्त, समान इतिहास आणि समान संस्कृती यांनी युक्त असे भावकीचे नाते आहे.” “सावरकरांनी जसे हिंदूंचे प्रबोधन केले तसे मुस्लिमांचे देखील केले त्यामुळे सावरकर हे मुस्लिम विरोधी नव्हते.”येत्या निवडणुकीत सर्वांनी शत प्रतिशत मतदान करण्याचा संकल्प करावा असे आवाहन देखील त्यांनी या प्रसंगी केले . या प्रसंगी समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या
कुंदन कुमारसाठे संस्थापक-अध्यक्ष थोरले बाजीराव पेशवे संस्था, मंजिरी मराठे कोषाध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,सुरेश साखळकर संस्थापक-अध्यक्ष बहुभाषिक ब्राह्मण संघ,संदीप डोळे मनोहर डोळे फाउंडेशन,अ‍ॅड. सन्मान आयाचित,अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर, किरणजी जोशी,उज्ज्वला गौड,वेदमूर्ती केशव दिवाकर दिगवेकर यांना सन्मानित करण्यात आले . महेश दादा लांडगे यांच्या वतीने श्री. कार्तिक लांडगे यांनी ब्रह्म मित्र विशेष पुरस्कार या प्रसंगी स्वीकारला. दिवाळी अंकाचे प्रकाशन:”न्यूज डंका” या मीडिया पार्टनरकडून प्रकाशित “351 व्या राज्याभिषेक सोहळा निमित्त दिवाळी अंक” ‘शिवरायांचे आठवावे प्रताप’ या दिवाळी अंकाचे पुनश्च प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र चिपळूणकर तर आभार डॉ.सचिन बोधनी यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्या साठी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, बहुभाषिक ब्राह्मण संघ ब्राह्मण सभा, राजगुरुनगर, महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा लोणावळा, अखिल ब्राह्मण संघ पुणे, विप्र फाउंडेशन पुणे,गोवर्धन ब्राह्मण संघ पुणे, परशुराम सेवा संघ पुणे, ब्राह्मण जागृती सेवा संघ, परशुराम सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र ब्राह्मण सभा , उत्तर भारतीय ब्राह्मण सभा पनवेल पेण व खोपोली, चित्पावन ब्राह्मण संस्था, शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण सभा पुणे, बोंड संस्था, युवोन्मेष परिवार पुणे, गौड ब्राह्मण संघटन, पुणे,. ब्राह्मण महासंघ, पुणे, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), पुणे केंद्र व आम्ही सारे ब्राह्मण,
ब्राह्मण सभा खोपोली जुन्नर केंद्र आदी संस्थांचे सहकार्य लाभले
दिनांक: 21 ऑक्टोबर 2024
स्थळ: ब्राह्मण सामर्थ्य संमेलन
समारंभाचा वेळ: सायंकाळी 6 वाजता
ब्राह्मण सामर्थ्य संमेलन उत्साहात संपन्न
ब्राह्मण सामर्थ्य संमेलन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाले. या समारंभात 600 लोकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात मंत्रपुष्पांजलीने झाली, आणि समारोप पसायदानाने झाला, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचे वातावरण मंगलमय झाले.
प्रमुख वक्ते:
श्री. राहुल सोलापूरकर यांनी “ब्राह्मण समाजाचे सामर्थ्य” या विषयावर विचार मांडले, तर विशेष वक्ते श्री. सात्यकी सावरकर यांनी “हिंदुत्व” या विषयावर मार्गदर्शन केले.
सन्मानित व्यक्ती:
समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये पुढील मान्यवरांचा समावेश आहे:
श्री. कुंदन कुमारसाठे, संस्थापक-अध्यक्ष, थोरले बाजीराव पेशवे संस्था
सौ. मंजिरी मराठे, कोषाध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
श्री. सुरेश साखळकर, संस्थापक-अध्यक्ष, बहुभाषिक ब्राह्मण संघ
डॉ. संदीप डोळे, मनोहर डोळे फाउंडेशन
अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर, सत्यकी सावरकर यांच्यासोबत सावरकरांविरोधातील अपमानजनक वक्तव्यावर केस लढणारे
अ‍ॅड. सन्मान आयाचित, ब्राह्मण शेतकऱ्यांचे संघटन करणारे
श्री. किरणजी जोशी, पिंपरी चिंचवड आवृत्तीचे प्रमुख, ‘पुढारी’ वृत्तपत्र
सौ. उज्ज्वला गौड, लव्ह जिहाद या विषयावर कार्य करणाऱ्या
वेदमूर्ती केशव दिवाकर दिगवेकर
विशेष श्रद्धांजली:
कार्यक्रमात श्री. वसंतराव गाडगीळ यांच्या अलीकडील निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली, ज्यामुळे सभागृहात भावनाप्रधान वातावरण निर्माण झाले.
ब्रह्म मित्र विशेष पुरस्कार:
महेश दादा लांडगे यांच्या वतीने श्री. कार्तिक लांडगे यांनी ब्रह्म मित्र विशेष पुरस्कार स्वीकारला. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची अर्धमूर्ती आणि उपरणे देऊन सन्मानित करण्यात आले.
सहकारी संघटना:
कार्यक्रमात सहभागी झालेल्या सहकारी संघटनांमध्ये:
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था
बहुभाषिक ब्राह्मण संघ
ब्राह्मण सभा, राजगुरुनगर
महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा, लोणावळा
अखिल ब्राह्मण संघ, पुणे
विप्र फाउंडेशन, पुणे
गोवर्धन ब्राह्मण संघ, पुणे
परशुराम सेवा संघ, पुणे
ब्राह्मण जागृती सेवा संघ
परशुराम सेवा प्रतिष्ठान
महाराष्ट्र ब्राह्मण सभा
उत्तर भारतीय ब्राह्मण सभा, पनवेल, पेन व खोपोली
चित्पावन ब्राह्मण संस्था
शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण सभा, पुणे
बोंड संस्था
युवोन्मेष परिवार, पुणे
गौड ब्राह्मण संघटन, पुणे
ब्राह्मण महासंघ, पुणे
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), पुणे केंद्र व जुन्नर केंद्
20.आम्ही सारे ब्राह्मण
21.ब्राह्मण सभा खोपोली
22.पौरोहित्य पुरोहित फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य.
दिवाळी अंकाचे प्रकाशन:
“न्यूज डंका” या मीडिया पार्टनरकडून प्रकाशित “351 व्या राज्याभिषेक सोहळा निमित्त दिवाळी अंक” ‘शिवरायांचे आठवावे प्रत