बातम्या आमदार महेश लांडगे यांचा कामगारांच्या बैठकीत संकल्प* October 23, 2024October 23, 2024 Editor – विजयाची हॅटट्ट्रीक’ करण्यासाठी महिंद्राच्या कामगारांची एकजूट *पिंपरी । प्रतिनिधी सखी न्यूज लाईव्हसायली कुलकर्णीपिंपरी-चिंचवड ही कामगार नगरी आहे. शहरातील लघु व मध्यम उद्योगांमध्ये तसेच विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना, युनियमच्या प्रतिनिधींना कामगार – व्यवस्थापन वादाबाबत पुणे-मुंबईत जावे लागते. मोशी येथे पिंपरी-चिंचवड न्यायालय संकुल उभारणीची पायाभरणी झाली आहे. आगामी काळात शहरात कामगार न्यायालय निर्माण व्हावे. यासाठी सर्वोतोपरी पाठपुरावा करणार आहे, असा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला.महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी कामगारांच्या वतीने कृतज्ञता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वाभिमानी कामगार संघटना, महिंद्रा अँड महिंद्रा वेहिकल्स, लॉजिस्टिक, हेवी इंजिनचे सभासद या संमेलनामध्ये सहभागी झाले होते.संमेलनामध्ये आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, स्वाभिमानी कामगार संघटनेचे नेते रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन यळवंडे, टाटा मोटर्स कार प्लांटचे योगेश तळेकर तसेच महिंद्रा कंपनीचे कर्मचारी प्रदीप तळेकर, राहुल तळेकर, पंकज लांडगे, अजय घाडगे, शुभम बवले, सचिन वहिले, सुरज लांडगे, आकाश गव्हाणे, गणेश भुजबळ, सचिन धापटे, सुयोग भालेकर, संतोष भुजबळ, विक्रम पाटील, प्रवीण नाळे, राजू मदगे, प्रशांत म्हस्के आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन धापटे यांनी केले.कामगार-मालक यांच्यातील वातावरण सामंजस्य व सौहार्दाचे राहावे, या दृष्टीने आमदार महेश लांडगे यांनी प्रयत्न केले आहेत. कंपनीमध्ये काही प्रसंगी तणाव निर्माण झाल्यास वाटाघाटीने प्रश्न सोडविले. कामगारांसाठी कायम मातृत्वाच्या भूमिकेतून त्यांनी कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये संवाद ठेवला. कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमधील संबंध बिघडू दिले नाहीत. कामगारांना किमान वेतन आणि मूलभूत सुविधांसह इतर अनेक लाभ मिळवून देण्यासाठी आमदार नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या या पुढाकारातून अनेक कामगार आज स्थिरस्थावर झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांना यंदा ‘ हॅट्रिक’ करण्याची संधी दिली. आता त्या संधीचे सोने कामगार करणार आहेत, असा विश्वास कामगारांनी व्यक्त केला.ईएसआय रुग्णालयासाठी कामगारांचे साकडे…या संमेलनामध्ये कामगारांनी ईएसआय रुग्णालय मोहननगर, चिंचवड परिसरात असल्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघ परिसरातील कामगारांना रुग्णसेवा घेण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागतो. अत्यावश्यक गरज पडल्यास या रुग्णालयात पोहोचेपर्यंत कामगाराची दमछाक होऊन जाते. त्यामुळे भोसरी परिसरातच ईएसआय रुग्णालय असावे . कामगार न्यायालय सुद्धा पुणे परिसरात असल्यामुळे कामगारांना ये-जा करताना वेळ आणि पैसा हे दोन्ही खर्च करावे लागतात.त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये न्यायालय संकुल उभारण्यासाठी आपण ज्याप्रमाणे पुढाकार घेतला. तसेच कामगार न्यायालय भोसरीतील न्यायालय संकुलात असावे अशी मागणी कामगारांनी या संमेलनात केली.प्रतिक्रिया :पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी आहे. या औद्योगिक नगरीमुळेच शहर नागरूपाला आले.येथील नागरिकांचे जीवनमान उंचावले. कामगार या नगरीचा कणा आहे असे मी मानतो. या कामगारांसाठी जे जे आवश्यक आहे ते उपलब्ध करून देण्याचा माझा नेहमीच कटाक्ष राहिला आहे आणि तो यापुढेही राहणार आहे. कामगारांना ईएसआय हॉस्पिटल, कामगार न्यायालय देण्याची जबाबदारी माझी आहे. शहराच्या न्यायालय संकुलाचा वीस वर्षे रखडलेला विषय गेल्या १० वर्षांत सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावला आहे. यापुढेही कामगारांचा कोणताही प्रश्न प्रलंबित राहणार नाही, अशी माझी सर्व कामगारांना ग्वाही आहे.महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड. Post Views: 54