बातम्या

पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

मोशी कचरा डेपो दुर्घटना :७ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या खात्यात आर्थिक मदतीची रक्कम जमा 

पिंपरी, दि.६ ऑगस्ट २०२६:मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून जलद गतीने सुरू आहे. महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने करण्यात येत असून, कागदपत्रांची पूर्तता झालेल्या लाभार्थ्यांच्या बँकखात्यात आर्थिक मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.  आतापर्यंत मृत अक्षय सावंत (वय ३५), सन्नी माने (वय ३९), राहुल गायकवाड (वय ३५), वामन कसबे (वय ३५), नागेश गायकवाड (वय २६), सुनील कोरके (वय ४०) आणि रणजीत पाटील (वय २२) यांच्या कायदेशीर वारसांच्या बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत नियमानुसार थेट जमा करण्यात आली आहे.  दुर्घटनेतील मृत भावेश वाणी आणि महेश कुंभार यांच्या कायदेशीर वारसांच्या कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नसल्याने त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदतीची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. संबंधित कागदपत्रे प्राप्त होताच आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या वारसांच्या खात्यातही नियमानुसार आर्थिक मदतीची रक्कम तातडीने जमा करण्यात येणार असल्याचे क्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.  मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच पात्र वारसांच्या बँक खात्यात आर्थिक मदतीची रक्कम थेट जमा केली जात आहे. उर्वरित लाभार्थ्यांची कागदपत्रे प्राप्त होताच त्यांनाही विलंब न लावता आर्थिक मदत वितरित करण्यात येईल.   * डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका  मोशी दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शक्य तितक्या लवकर आर्थिक दिलासा मिळावा, ही महानगरपालिकेची भूमिका आहे. कोणत्याही मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी प्रशासनाला आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरित मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांची आवश्यक कागदपत्रे प्राप्त होताच नियमानुसार आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल.  * रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर द्यावा – मंत्री जयकुमार गोरे

मुंबई : स्वयं सहाय्यता गटांमधील गरीब व गरजू महिलांना विविध उपजीविका उपक्रम, कौशल्य विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

“टेंडर काढून टक्केवारी हवी असेल तर भीक मागून गोळा करून देतो; पण विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करून शालेय साहित्य द्या!”

प्रशासनाचा डीबीटीचा पारदर्शक प्रस्ताव भाजप नगरसेवकांनी फेटाळला; ठेकेदारांच्या फायद्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ – आमआदमी पार्टी युवक आघाडीचा आरोप पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र विशेष मोटार वाहन न्यायालय!

आमदार महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्या लायशमंत्रिमंडळाचा निर्णय; वाहतूक प्रकरणांच्या जलद निपटाऱ्याचा मार्ग मोकळा पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

शहरावार आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी अमित शाह यांना निमंत्रण

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले निमंत्रण पिंपरी –  पिंपरी-चिंचवड शहराच्या ऐतिहासिक विकास प्रवासावर आधारित पुस्तकाच्या लोकार्पणासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

बिर्ला हॉस्पिटलजवळील पुलाचे तुटलेले कठडे तातडीने दुरुस्त करण्याची विश्वजीत बारणे यांची मागणी

पिंपरी : पिंपरी ते डांगे चौक–चिंचवड मार्गावरील बिर्ला हॉस्पिटलजवळील पुलाचे संरक्षक कठडे मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटले

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

स्थायी समितीच्या सभेत पशुवैद्यकीय सेवा, क्रीडा सुविधा, शिष्यवृत्ती, पायाभूत सुविधा व आपत्कालीन सेवांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय 

पिंपरी, दि. ५ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज बाबासाहेब त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

हर्षवर्धन सपकाळ यांनी त्वरित जाहीर माफी मागावी.. योगेश बहल

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वात भारतीय काँग्रेस पक्षाच्या जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेसचे

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते हॅकेथॉन २०२५च्या विजेत्यांचा करण्यात आला गौरव

तरुणांच्या नवोन्मेषी कल्पनांचा झाला सन्मान पिंपरी ५ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हॅकेथॉन २०२५’ स्पर्धेतील विजेत्यांचा

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

‘ईपीएस’ पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करा

खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी पिंपरी – कर्मचारी पेन्शन योजना १९९५ (EPS-९५) अंतर्गत येणाऱ्या लाखो पेन्शनधारकांची परिस्थिती अत्यंत

Read More