Sunday, May 3, 2026
Latest:
बातम्या

पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे आचार्य प्र के अत्रे पुरस्कार जाहीर!

Sakhi news live
| पिंपरी,दि 24 जून,प्रतिनिधी |
कवी,लेखक,राजकारणी व ज्येष्ठ पत्रकार असलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या नावाने पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ पत्रकार मा विजय भोसले यांना आचार्य प्र के अत्रे पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
काळेवाडी येथील हॉटेल कुणाल मधील भव्य फंक्शन हॉलमध्ये उद्या दिनांक 25 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास शहरातील असंख्य पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
सत्कारमूर्ती मा विजय भोसले हे दैनिक केसरीचे पिंपरी चिंचवड चे आवृत्ती प्रमुख असून मुंबई अधिवेशन, नागपूर अधिवेशनातील त्यांचे वार्तांकन महाराष्ट्रात मोठ्या आवडीने वाचले जाते.ज्येष्ठ पत्रकार मा विजय भोसले यांचे पिंपरी चिंचवड,पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात लाखो नियमित वाचक आहेत. मराठी पत्रकार क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्यासाठी ते एक चालते बोलते व्यासपीठ समजले जाते.आजही प्रसारमध्यमातील अनेक पत्रकार त्यांचे मार्गदर्शन घेताना आढळतात. विधिमंडळ वार्ताहर म्हणून ते गेली 32 वर्षे नियमित काम करीत आहेत. अंधश्रद्धा,भ्रष्टाचार प्रकरणी त्यांचा सखोल अभ्यास असून त्याविरोधी त्यांची अनेक प्रकरणे राज्यभर गाजली आहेत.
मराठी पत्रकार संघ या राज्यस्तरीय संघटनेला संलग्न झालेल्या पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार मा विजय भोसले यांना प्र के अत्रे पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरले असून उद्या मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरित करण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव यांनी सांगितले यावेळी संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, संतलाल यादव,सुनील कांबळे, महेश मंगवडे, जितेंद्र गवळी, कलिंदर शेख,दिलीप देहाडे,संजय बोरा, गणेश शिंदे, संतोष जराड, सायली कुलकर्णी, श्रद्धा कोतावडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते