१ ली ते ७ वी शाळेची घटा वाजनार नाही आयुक्त पाटील !

पिंपरी प्रतिनिधी सखी न्युज लाइव्ह
पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड १९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत काय आहेत आदेश :-
१ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इ . १ ली ते इ . ७ वी चे वर्ग सुरु करण्यास १५ डिसेंबर २०२१ पर्यंत स्थगिती देण्यात येत आहे . कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन इ . १ ली ते इ . ७ वी चे वर्ग सुरु करणेबाबत पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील . पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इ . १ ली ते इ . ७ वी चे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद राहतील . मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील

२ ) संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे / मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० , तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील . सदर आदेश दि . ०१.१२.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील असे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात दिले आहेत