महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या मागणीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील व्यावसायिकांना दिलासा

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या मागणीमुळे
पिंपरी-चिंचवड शहरातील व्यावसायिकांना दिलासा शहरात दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत राहणार सुरू
पिंपरी :- प्रतिनिधी सखी न्युज लाईव्ह
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापारी वर्गांना, दुकानदारांना दिलासा द्यावा व दुकाने व व्यवसाय रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावी असे आदेश देण्याची मागणी केली होती त्यांच्या या मागणीला यश आले असून आज पालक मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरात सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार तसेच शनिवार व रविवार या दोन दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील तसेच व्यावसायिकांनी व दुकानदारांनी त्यांनी आपली साप्ताहिक सुट्टी घ्यावी असा निर्णय पालकमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
दोन-तीन दिवसांपूर्वीच महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील व्यावसायिकांना दिलासा द्यावा व दुकाने व व्यवसाय रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी केली होती त्यांची मागणीची तत्पर दखल घेण्यात आली असून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत महापौर माई ढोरे यांच्या मागणीला यश आले आहे.
काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील व्यवसायिकांनी महापौर माई ढोरे यांच्याकडे निर्बंध कमी करून दुकाने रात्री सहा वाजेपर्यंत सुरू ठेवावी अशी मागणी केली होती.आजच्या या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे