साबळेवाडी, राजेवाडीतील आदिवासी कुटुंबांना सानप दांपत्याचा मदतीचा हात
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम
सचिन सानप आणि नगरसेविका रिटा सानप यांच्या पुढाकारातून मदत किटचे वाटप

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
खेड तालुक्यातील साबळेवाडी आणि राजेवाडी येथील गरजू आदिवासी कुटुंबांना भाजपचे युवा नेते सचिन सानप आणि नगरसेविका रिटा सानप यांच्या पुढाकारातून मदत किटचे वाटप करण्यात आले. भाजप नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमांतर्गत धान्य, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तू कुटुंबांना देण्यात आल्या.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या शुभेच्छांना लोकसेवेची जोड देण्याचे आवाहन आमदार लांडगे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सचिन आणि रिटा सानप यांनी खेड तालुक्यातील दुर्गम भागात मदतवाटपाचा उपक्रम हाती घेतला. साबळेवाडी आणि राजेवाडी या दोन्ही ठिकाणी आदिवासी कुटुंबांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन धान्य आणि किराणा साहित्याचा मदत किटमध्ये समावेश करण्यात आला.
वाटपप्रसंगी सरपंच शुभांगी निलेश साबळे, प्रवीण कोकणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नामदेव साबळे, अशोक गभाले, महादेव पाटील, स्वप्निल खोत, राहुल ठाकरे, आकाश पाटील, स्वप्निल काटे, स्वप्निल भोसेकर, संतोष केंगार, अरुण आल्हाट, स्वप्निल शिरसाठ, राजेश अभंग, वैभव चौगुले, सागर लांडगे, तेजस वाघोले, राहुल ढवळे आणि सोनू मुंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
“महेशदादांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांना लोकसेवेची जोड देण्याचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत आम्ही सहकाऱ्यांसह साबळेवाडी आणि राजेवाडीतील गरजू आदिवासी कुटुंबांपर्यंत धान्य, किराणा आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या. घरचा किराणा कसा भागवायचा, ही चिंता या मदतीमुळे काही दिवस जरी हलकी झाली, तरी आमच्या प्रयत्नांना अर्थ मिळाला, असं आम्ही मानतो. या कामात साथ देणाऱ्या ग्रामस्थांचे आणि सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार.”
– रिटा सानप, नगरसेविका, भाजपा.
