पिंपरी चिंचवडबातम्या

महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन…

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे…

पिंपरी, दि.२५ नोव्हेंबर २०२६ :- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी भारताचे माजी उपपंतप्रधान यांसह केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री अशी अनेक पदेही भूषविले असून ते राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते होते असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील यशवंतराव चव्हाण पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.

 
दरम्यान महानगरपालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस,वल्लभनगर येथील पुतळ्यास यांच्या हस्ते उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमास आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी, माजी महापौर योगेश बहल,नगरसदस्य जितेंद्र ननावरे,वर्षा जगताप, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर,विक्रांत बगाडे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.लक्षमण गोफणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, मेट्रन वत्सला वाजे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष महादेव बोत्रे तसेच विजय मुंडे,सविता निगडे, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे,आरोग्य सहाय्यक मोहन वाघमारे आदी कर्मचारी उपस्थित होते.