पिंपरी चिंचवडबातम्या

निकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका; ठेकेदाराचे बिल रोखावे नगरसेवक संदीप वाघेरे यांची स्थायी समितीच्या बैठकीत मागणी

Sandip Waghere17:19 (16 minutes ago)
to amit, Amol, ganesh, Baban, Ganesh, jayant, ,, mangesh, milindkambale7, Nandkumar, anil, MILIND, pavanasamachar@gmail.com, pravin, sandesh, Prajecha, Sanket, Santosh, santlal, vishwas, vivek, vsrsnews, me, Suhas, Avinash, Amrapali, arunm.zeenews, MPC, Daily, Rohit, नवनायक, narayan, bright.ads1, Anushka, ,, ,, amol.gulumbe, ,, dr.harshvardhan, Yashwant

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात जेजुरी एमआयडीसी येथील ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल्स अँड रिसर्च फाउंडेशन’ या कंपनीकडून दर करारांतर्गत (रेट कॉन्ट्रॅक्ट) पुरवठा झालेली १८ पैकी तब्बल १७ औषधे निकृष्ट व निष्प्रभ आढळली आहेत. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या कंपनीला केवळ तीन वर्षांसाठी नव्हे, तर कायमस्वरूपी काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावे आणि कोणाच्याही दबावाखाली येऊन संबंधित ठेकेदाराला निकृष्ट औषधांचे बिल अदा करू नये, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित कंपनीकडून दर करारांतर्गत नेमकी किती औषधे खरेदी करण्यात आली, याचे एकूण बिल किती कोटी रुपयांचे झाले आहे, कंपनीला आत्तापर्यंत किती रक्कम अदा केली आणि किती देणे बाकी आहे, याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी. तसेच, या कंपनीकडून २३९ प्रकारची औषधे कधीपासून घेतली जात होती आणि यापूर्वी पुरवठा झालेल्या इतर औषधांच्या दर्जाची चौकशी झाली आहे का, असा सवालही वाघेरे यांनी उपस्थित केला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईत या कंपनीकडे काही औषधांच्या उत्पादनासाठी वैध परवानगी नसल्याचे समोर आले आहे. असे असताना महापालिकेने कागदपत्रांची पडताळणी न करता उत्पादन परवानगी नसलेली औषधे खरेदी केली होती का, याचा खुलासा प्रशासनाने करावा. कोट्यवधी रुपयांची औषधे खरेदी करताना अधिकाऱ्यांकडून इतका मोठा हलगर्जीपणा कसा झाला, याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वाघरे यांनी केली आहे. गरिब आणि सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात येतात. त्यांना जीवनदान देण्याऐवजी निष्प्रभ औषधे देऊन त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. निकृष्ट औषधांचे पैसे ठेकेदाराला देण्याच्या हालचाली सुरू असतील, तर त्या तात्काळ थांबवाव्यात. प्रशासनाने या ठेकेदाराला पैसे दिल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने दाद मागू, असा इशारा वाघेरे यांनी दिला आहे.कृपया प्रसिद्धीसाठी

निकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका; ठेकेदाराचे बिल रोखावे

नगरसेवक संदीप वाघेरे यांची स्थायी समितीच्या बैठकीत मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात जेजुरी एमआयडीसी येथील ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल्स अँड रिसर्च फाउंडेशन’ या कंपनीकडून दर करारांतर्गत (रेट कॉन्ट्रॅक्ट) पुरवठा झालेली १८ पैकी तब्बल १७ औषधे निकृष्ट व निष्प्रभ आढळली आहेत. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या कंपनीला केवळ तीन वर्षांसाठी नव्हे, तर कायमस्वरूपी काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावे आणि कोणाच्याही दबावाखाली येऊन संबंधित ठेकेदाराला निकृष्ट औषधांचे बिल अदा करू नये, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित कंपनीकडून दर करारांतर्गत नेमकी किती औषधे खरेदी करण्यात आली, याचे एकूण बिल किती कोटी रुपयांचे झाले आहे, कंपनीला आत्तापर्यंत किती रक्कम अदा केली आणि किती देणे बाकी आहे, याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी. तसेच, या कंपनीकडून २३९ प्रकारची औषधे कधीपासून घेतली जात होती आणि यापूर्वी पुरवठा झालेल्या इतर औषधांच्या दर्जाची चौकशी झाली आहे का, असा सवालही वाघेरे यांनी उपस्थित केला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईत या कंपनीकडे काही औषधांच्या उत्पादनासाठी वैध परवानगी नसल्याचे समोर आले आहे. असे असताना महापालिकेने कागदपत्रांची पडताळणी न करता उत्पादन परवानगी नसलेली औषधे खरेदी केली होती का, याचा खुलासा प्रशासनाने करावा. कोट्यवधी रुपयांची औषधे खरेदी करताना अधिकाऱ्यांकडून इतका मोठा हलगर्जीपणा कसा झाला, याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वाघरे यांनी केली आहे. गरिब आणि सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात येतात. त्यांना जीवनदान देण्याऐवजी निष्प्रभ औषधे देऊन त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. निकृष्ट औषधांचे पैसे ठेकेदाराला देण्याच्या हालचाली सुरू असतील, तर त्या तात्काळ थांबवाव्यात. प्रशासनाने या ठेकेदाराला पैसे दिल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने दाद मागू, असा इशारा वाघेरे यांनी दिला आहे.