पिंपरी चिंचवडबातम्या

थेरगावात दिवाळी फराळ स्नेह मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी – दिवाळीच्या निमित्ताने स्नेहाचा, आपुलकीचा अन् माणसांच्या भेटीगाठींचा गोड सोहळा म्हणून ओळखला जाणारा ‘दिवाळी फराळ स्नेहमेळावा’ थेरगाव येथे शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेना गटनेते विश्वजित बारणे आणि नगरसेवक नीलेश बारणे यांच्या वतीने आयोजित या स्नेहमेळाव्याला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन माणसांना एकत्र आणणारा हा मेळावा दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा ठरला. अडीच हजाराहून अधिक नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहत फराळाचा आस्वाद घेतला. शहराच्या विविध भागांतून आलेले हजारो नागरिक, विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते, आमदार, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीने हा सोहळा गजबजून गेला होता. यादरम्यान उपस्थितांनी दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

या स्नेहमेळाव्याला खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर अमित गोरखे, उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार बापूसाहेब पठारे,विलास लांडे, गौतम चाबुकस्वार यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढवली. उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक विठ्ठल काटे,  भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे,  शिवसेना जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना जिल्हा महिला संघटिका शैलाताई भोंडवे, शहर संघटिका सरिताताई साने, शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक निलेश तरस, कुणाल वाव्हळ , सुरेश भोईर, संजय काटे, शेखर चिंचवडे, नगरसेविका ऐश्वर्या तरस, मनीषा पवार, योगिता बारणे, शालिनीताई गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.