पिंपरी चिंचवडबातम्या

स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपच्या वतीने अभिवादन

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपचे दिवंगत पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

यावेळी भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे यांच्या हस्ते स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मृतींना वंदन केले.

या प्रसंगी जिल्हा महामंत्री मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, नगरसेवक निखिल बोर्हाडे, चंद्रकांत नखाते, भाजप प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे, संतोष तापकीर, देवदत्त लांडे, रवींद्र देशपांडे, दिलीप राऊत, रविंद्र नांदुरकर, रामदास काळजे, संजय परळीकर, मनीष पंजाबी, नंदूकाका भोगले यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या कार्याचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.