‘दिल तो है दिल’पासून ‘मल्हारवारी’पर्यंत; पुणे लोकमान्य फेस्टिवलमध्ये रंगला ‘गीतों का सफर’
मराठी हिंदी गीतांचा सुरेल संगम ‘गीतों का सफर’ मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध

पुणे (प्रतिनिधी) : पुणे लोकमान्य फेस्टिवल नवरात्र उत्सव २०२६ मध्ये जितेंद्र भूरुक प्रस्तुत ‘गीतों का सफर’ या विशेष संगीतमय कार्यक्रमाने रसिकांना अजरामर मराठी आणि हिंदी गीतांची सुरेल मेजवानी अनुभवायला मिळाली.
लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. जुन्या आणि नव्या पिढीच्या रसिकांना भावणाऱ्या गीतांनी संपूर्ण मैफल रंगतदार झाली.या कार्यक्रमात गायक जितेंद्र भूरुक, मेधा चांदवडकर, अश्विनी कुरपे आणि आकाश सोळंकी यांनी आपल्या सुरेल आवाजात विविध लोकप्रिय गीते सादर केली. ‘ये नाम रे’, ‘दिल तो है दिल’, ‘दिलबर मेरे’, ‘ओ मेरे दिल के’, ‘वल्लव रे नाखवा’, ‘एक हसीना थी’, ‘मल्हारवारी’ आणि ‘परदेसिया’ यांसारख्या गाजलेल्या गीतांनी रसिकांची मने जिंकली. मराठी आणि हिंदी संगीताचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
गीतांची निवड, गायकांचे सादरीकरण आणि संगीताची सुरेल साथ यामुळे मैफलीला विशेष रंगत आली.या संगीतमय कार्यक्रमाला वादक कलाकार रशीद शेख, हार्दिक रावल, बाबा खान, नंदू डेव्हिड, सुनील साळवी आणि रोहित साने यांनी आपल्या वादनातून मोलाची साथ दिली. गायक आणि वादक यांच्यातील सुरेल समन्वयामुळे प्रत्येक गीताचा आनंद अधिक खुलला. लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने रसिकांसाठी हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. अशी माहिती पुणे लोकमान्य फेस्टिवलचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते यांनी दिली.
