आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त महा जन-आरोग्य शिबिर; ८२३ नागरिकांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ
तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी; आयुष्मान भारत कार्ड नोंदणीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड, दि. ११ सप्टेंबर २०२६ (प्रतिनिधी) : नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली आमदार अमित गोरखे यूथ फाऊंडेशन, संविधान संस्कार परिषद आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धिविनायक मंदिर, संभाजीनगर, चिंचवड येथे भव्य महा जन-आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार सौ. उमाताई खापरे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
आमदार अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनातून आणि नेतृत्वाखाली नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत आयोजित करण्यात आलेल्या या महा जन-आरोग्य शिबिरास पिंपरी विधानसभा मतदारसंघातील तसेच प्रभागातील ८२३ हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध आरोग्य तपासण्या व तज्ज्ञ वैद्यकीय सेवांचा लाभ घेतला.

नागरिकांना वेळेवर आरोग्य तपासणी, वैद्यकीय मार्गदर्शन आणि आवश्यक उपचार उपलब्ध व्हावेत, तसेच आरोग्यविषयक जनजागृती वाढावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विविध तज्ज्ञ वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी
शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. जनरल चेकअपअंतर्गत व्हायरल इन्फेक्शन, ताप, रक्तदाब, मधुमेह तसेच विविध सामान्य आजारांची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले.
नेत्र व अस्थिरोग तपासणी अंतर्गत डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू तपासणी तसेच आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कान, नाक व घसा (E.N.T.) संबंधित आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.
महिलांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी, गरोदर महिलांची तपासणी व आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. बालरोग तज्ज्ञांकडून बालकांची तपासणी, तर त्वचारोग तज्ज्ञांकडून त्वचेच्या विविध विकारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरज असलेल्या नागरिकांसाठी ईसीजी तपासणीची सुविधाही मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
आयुष्मान भारत कार्ड नोंदणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिबिराच्या ठिकाणी आयुष्मान भारत कार्ड नोंदणी केंद्राची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पात्र नागरिकांची नोंदणी करून त्यांना आयुष्मान भारत कार्ड काढून देण्यात आले. या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात विविध आजारांवरील उपचार तसेच आवश्यक शस्त्रक्रियांसाठी उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.
“निमित्त वाढदिवसाचे, सेवा समाजाची”
वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छा, सत्कार आणि आनंदोत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्याची संकल्पना या आरोग्य शिबिरातून प्रत्यक्षात आणण्यात आली. आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने पुढे नेली जात आहे.
“निमित्त वाढदिवसाचे, सेवा समाजाची” या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम जनसेवेची सकारात्मक परंपरा अधिक बळकट करणारा ठरला.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर, माजी महापौर सौ. मंगलाताई कदम, शहर सुधारणा समिती सभापती श्री. संजय नाना पाटील, ब प्रभाग अध्यक्ष नगरसेवक श्री. मंदार देशपांडे, नगरसेविका सौ. सुप्रियाताई चांदगुडे, नगरसेविका सौ. शैलीजाताई मोरे, नगरसेविका सौ. मधुरा शिंदे, नगरसेवक श्री. तुषार हिंगे, नगरसेवक श्री. कुशाग्र कदम, नगरसेवक श्री. अमित गावडे, नगरसेवक श्री. राजू मिसाळ, नगरसेवक श्री. बापू घोलप, श्री. सदाशिव खाडे सर, पिंपरी-चिंचवड भाजपा मुख्य प्रवक्ते श्री. राजाभाऊ दुर्गे, मंडलाध्यक्ष सौ. अनिताताई वाळुंजकर, सरचिटणीस सौ. वैशाली खाडे, श्री. योगेश बाबर, श्री. नेताजी शिंदे, श्री. अमित बाबर, श्री. प्रसाद शेट्टी, श्री. विशाल काळभोर, श्री. मारुती जाधव, श्री. मयूर काळभोर, श्री. बादशाह इटकर, श्री. सतीश बाराहाते, श्री. शैलेश कुलकर्णी, श्री. अजित भालेराव, श्री. मोहिते, श्री. वाडकर तसेच सावरकर मित्र मंडळातील पदाधिकारी, आमदार अमित गोरखे यूथ फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महा जन-आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय तज्ज्ञ, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, सावरकर मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आमदार अमित गोरखे यूथ फाऊंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
अनुराधाताई गोरखे म्हणाल्या…
“आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य देत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मिळणाऱ्या शुभेच्छा आणि प्रेमाला समाजसेवेची जोड देण्याचा आमचा प्रयत्न आहे. परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज आणि मोफत उपलब्ध व्हावी, गरजू नागरिकांना वेळेवर आजाराचे निदान व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे, तसेच पात्र नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने या महा जन-आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ८२३ हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. भविष्यातही आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी असे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
