विनोद, मिश्किलपणा अन् टाळ्यांचा कडकडाट; ‘हास्यपंचमी’ने जिंकली रसिकांची मने
हशांच्या लाटेवर स्वार झाली ‘हास्यपंचमी’; बंडा जोशींनी जिंकली रसिकांची मने

पुणे : “इतक्या खळखळून हसा, इतके खळखळून हसा की जल्लोष झाला पाहिजे आणि अशा जोरदार टाळ्या वाजवा की जोशही वाढला पाहिजे,” अशा उत्स्फूर्त आवाहनाला प्रतिसाद देत रसिकांनी हास्याची मनमुराद लूट केली. सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवात प्रसिद्ध विनोदी कलाकार बंडा जोशी यांच्या ‘हास्यपंचमी’ या बहारदार कार्यक्रमाने उपस्थितांना मनसोक्त हसवले.
सहकारनगर क्रमांक २ येथील सहजीवन गणेश मंदिर मंडपात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मराठीतील खुसखुशीत विनोद, मिश्किल शैली, दैनंदिन जीवनातील गमती-जमती आणि विविध प्रसंगांवर आधारित हलके-फुलके सादरीकरण यामुळे संपूर्ण वातावरण हास्याच्या फुलबाजीने रंगून गेले. बंडा जोशी यांच्या खास शैलीतील विनोदांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि हशाच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
“माणूस खळखळून हसतो, तो ईश्वराची प्रार्थना करत असतो आणि जो दुसऱ्यांना हसवतो, त्याच्यासाठी ईश्वर प्रार्थना करत असतो,” या भावनेतून हास्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या कार्यक्रमाने उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण आनंदाचे, तणावमुक्त आणि प्रसन्न वातावरणाचे अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून पुणेकरांना मिळाली.सांस्कृतिक महोत्सवाचे अध्यक्ष राजेश दातार, ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष सुयश साबडे, कार्याध्यक्ष मदन कटारिया हाे आहेात
