बातम्या *पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे स्व. श्री रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.* October 15, 2024October 15, 2024 Editor पिंपरी चिंचवड परतिनिधीसखी न्यूज लाईव्हसायली कुलकर्णीभारताच्या औद्योगिक जगताचे पितामह पद्मविभूषण स्व. रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण करण्यासाठी पिं.चिं. सायन्स पार्क आणि तारांगण येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेमध्ये मरकड इंडस्ट्रियल असोसिएशन, इंद्रायणी इंडस्ट्रियल असोसिएशन व सायन्स पार्क सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमात पिं.चिं.मनपा कर्मचारी महासंघाचे श्री. अनिल राऊत, माजी नगरसेवक श्री. मारुती भापकर, लघुउद्योग संघटनेचे श्री. बाळासाहेब शेंडगे, उद्योजक श्री. संदीप बेलसरे, श्री. प्रमोद राणे तसेच श्री. राहुल देशपांडे, श्री. गवळी इ. उपस्थित मान्यवरांनी स्व.श्री. रतन टाटा यांनी पिंपरी चिंचवड परिसरात केलेल्या उद्योगांची ६-७ दशकांपूर्वी केलेली मुहूर्तमेढ व त्या अनुषंगाने झालेला सामाजिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक विकास इत्यादींची संस्मरणे सांगितली. पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक संचालक श्री. प्रवीण तुपे यांनी पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या जडणघडणीत विशेषतः ऑटोमोबाईल कक्षासाठी टाटा मोटर्सने दिलेले योगदान आणि कल्पकघर या आयसर, पुणे व सायन्स पार्कच्या संयुक्त उपक्रमास टाटा टेक्नॉलॉजीमुळे विद्यार्थी व शिक्षक जगताची पिंपरी चिंचवड परिसरात झालेली शैक्षणिक सुविधा यांचा खास उल्लेख केला व उपस्थित सर्व सहयोगी संस्थांच्या वतीने तसेच पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण यांच्या विकासास स्व. रतन टाटा यांची प्रेरणा सतत मिळत राहो, त्यांच्या सद्गत आत्म्यास प्रभुचरणी चिरशांती मिळो अशी प्रार्थना व श्रद्धांजली अर्पण केली. Post Views: 33