बातम्या *महाविकास आघाडीत ज्या पक्षाला जागा त्या पक्षात प्रवेश आहेत* October 7, 2024October 7, 2024 Editor महाविकास आघाडीत ज्या पक्षाला जागा त्या पक्षात प्रवेश..चिंचवड मतदार संघातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा निर्धार…करताचसखी न्यूज लाईव्ह. इनसायली कुलकर्णीपिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२४) :- आगामी निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला न मिळाल्यास महाविकास आघाडीत ज्या पक्षाला जागा मिळेल, त्या पक्षात प्रवेश करण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवडमधील माजी नगरसेवकांनी केला. याबाबत दाेन दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ठरावाची प्रत दिली जाणार आहे. त्यामुळे चिंचवडच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.ताथवडे येथे शुक्रवारी (४ ऑक्टोबर) चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या सर्व माजी नगरसेवकांची बैठक झाली. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विनोद नढे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, संतोष कोकणे, कैलास बारणे, माजी नगरसेविका उषा काळे यावेळी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी चिंचवडची जागा राष्ट्रवादीला न मिळाल्यास भाजपच्या प्रचारावर बहिष्कार घालण्याचा इशारा चार माजी नगरसेवकांनी दिला हाेता.आम्ही सर्व जण एकत्र असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चिंचवडच्या जागेची मागणी करणार आहाेत. राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता भाजपचे काम करणार नाही. आमच्यापैकी ज्याला उमेदवारी मिळेल, त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, असे माजी नगरसेवक मयूर कलाटे यांनी सांगितले. Post Views: 45