महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

पिंपरी, दि. २४ नोव्हेंबर २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्या सुमन पवळे,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चौधरी,प्रदीप पाटील,दादा पगार,रामाशंकर प्रसाद, राजाराम राऊत, भिकाजी केंजळे, संतोष कवडे, अनिता लांडे, विजय गांगुर्डे,सतीश झेंडे,बाळा मोरे, दिपक पवार,ओंकार पवळे,विनित गवारे, मेजर माने,संदीप कवडे तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
