पिंपरी चिंचवडबातम्या

वाडा गावातील वाड्या-वस्त्यांवर पोहोचली महिनाभराची अन्नधान्य मदत

 नगरसेवक निलेश नेवाळे यांच्या पुढाकाराने ४०० किटचे वाटप
– आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा’

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
वाडा गावातील विविध वाड्या-वस्त्यांवरील गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य असलेल्या ४०० किटचे वाटप रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) करण्यात आले. नगरसेवक निलेशदादा नेवाळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

भाजप नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लोकनेत्याच्या वाढदिनानिमित्त लोकसेवेचा यज्ञ’ या संकल्पनेतून ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत वाडा गावातील वाड्या-वस्त्यांपर्यंत अन्नधान्याची मदत पोहोचविण्यात आली. प्रत्येक किटमध्ये एका कुटुंबाला महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य देण्यात आले.

वाटपप्रसंगी माजी नगरसेवक अजय सायकर, हिंदुराव पाटील, सुधाकर धुरी, अशोक मगर, युवराज निलवर्ण, मनोज कुहिटे, अंकुश नेवाळे, वाडा गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय केदारी आणि निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशनचे सभासद उपस्थित होते.
****
प्रतिक्रिया :

“वाडा गावातील वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या गरजू कुटुंबांना महिनाभराच्या अन्नधान्याची मदत थेट पोहोचवावी, या हेतूने आम्ही ४०० किटचे वाटप केले. आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमातून या कुटुंबांच्या दैनंदिन गरजेला हातभार लावता आला, याचे समाधान आहे.”
– निलेश नेवाळे, नगरसेवक, भाजपा.