पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या मतदानानंतर भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतला विसावा!

पिंपरी-चिंचवड:- पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गेल्या १२ ते १३ दिवसांपासून धावपळ करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर चिंचवड येथील फत्तेचंद जैन हायस्कूलजवळील बूथ परिसरात विसावा घेतला.
पुणे विभाग पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पिंपरी विभागातील मतदान केंद्र हे चिंचवड येथील फत्तेचंद जैन हायस्कूल मध्ये होते, सर्व मतदारांना मतदान करावे असे आवाहन केले.

भारतीय जनता पार्टीचे पदवीधर उमेदवार सौ. स्मिताताई जाधव व शिक्षक चे उमेदवार श्री कौस्तुभ गावडे सर यांचे प्रचारार्थ गेली 12,13 दिवस धावपळ केली त्यानंतर आज दिनांक 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान 4.00 वाजता मतदान प्रक्रिया थांबली त्या वेळी सर्व कार्यकर्त्यांनी शाळेजवळील बूथ जवळ विसावा घेतला.
या वेळी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले समवेत आमदार श्री अमितजी गोरखे, आमदार सौ उमाताई खापरे ,श्री सदाशिवराव खाडे सर, मा. उप महापौर तुषारजी हिंगे,मा.नगरसेवक श्री राजू दुर्गे, नगरसेवक अमितजी गावडे, नगरसेवक कैलासजी कुटे, नगरसेवक कुशाग्रजी कदम, मा नगरसेवक नामदेव ढाके,माऊली सूर्यवंशी, मंडल अध्यक्ष मंगेशजी धाडगे,इत्यादी मान्यवर छायाचितत्रात दिसत आहेत.
