पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभेत भाजपा-महायुतीची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक;
डॉ. सौ. स्मिताताई जाधव व श्री. कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा ठाम निर्धार
आमदार प्रसादजी लाड, आमदार स्नेहाताई दुबे, आमदार अमित गोरखे व आमदार उमाताई खापरे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती

पिंपरी, 21 ऑक्टोबर 2026 : आगामी पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड येथील हॉटेल बर्ड व्हॅली, चिंचवड येथे पिंपरी विधानसभा मतदारसंघाची अत्यंत महत्त्वाची संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सौ. स्मिताताई जाधव (पदवीधर मतदारसंघ) आणि श्री. कौस्तुभ गावडे (शिक्षक मतदारसंघ) यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा ठाम निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.
या बैठकीस पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर निवडणूक पिंपरी विधानसभा प्रभारी तथा आमदार श्री. प्रसादजी लाड, सहप्रभारी तथा आमदार सौ. स्नेहाताई दुबे, आमदार श्री. अमित गोरखे, आमदार सौ. उमाताई खापरे, भाजपा शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठ प्रभारी श्री. अनुप मोरे, पिंपरी-चिंचवड शिक्षक मतदारसंघ निवडणूक संयोजक श्री. राजेशअण्णा पिल्ले आणि श्री. सदाशिव खाडे, उपमहापौर सौ. शर्मिला बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बैठकीला सर्व माजी नगरसेवक, सर्व भाजपा सरचिटणीस, पिंपरी विधानसभेतील सर्व मंडल अध्यक्ष, पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर निवडणूक पिंपरी विधानसभेतील प्रमुख कार्यकर्ते, भाजपाचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी तसेच निवासी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तळागाळातील मतदार नोंदणी, प्रत्यक्ष संपर्क अभियान आणि संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने मैदानात उतरण्याचे आवाहन यावेळी प्रमुख नेत्यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी नमूद केले की, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. महायुती सरकारने घेतलेले जनहितकारी निर्णय आणि धोरणे घराघरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. बूथ स्तरावर मजबूत नेटवर्क तयार करून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचूया आणि दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करूया.
