दत्ता काका साने कुटुंबाला सांत्वनाभेटी पाेहचले पवार कुंटुब

SAKHI NEWS LIVE:-

राष्ट्रवादी पक्षाचे खासदार शरद पवार साहेब आज नुकतीच चिखली, साने वस्ती येथील दिवंगत दत्ता साने यांच्या घऱी सांत्वनभेटी पोहचले. तिथे त्यांनी दत्ता साने यांच्या पत्नी, आई, भाऊ व मुलांची भेट घेतली. पवार यांनी त्यांच्या आईशी संवाद साधत त्यांना काळजी घेण्यास सांगितले.

त्यानंतर दुपारी बारा वाजता शरद पवार यांचा ताफा भोसरी, लांडेवाडी येथील माजी आमदार विलास लांडे यांच्या घरी पोहचला. पितृशोक झालेल्या विलास लांडे यांना त्यांनी धीर दिला. तसेच कुटुंबातील सदस्यांची विचारपूस केली. यावेळी पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेविका मंगला कदम व पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी देखील साने कुटुंबायांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे.

यावेळी साने कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.