पिंपरी चिंचवडबातम्या

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 1985 ते 2000 माजी विदयार्त्यांचा सेह मेळावा उसाहत सपन्न

रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी रावेत येथील पूर्वीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सन 1985 ते 2000 सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा समीर लॉन्स येथे घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थ्यांनी केले होते.

प्रथम माजी शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर राष्टगीत , प्रतिज्ञा , प्रार्थना घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बसवेश्वर हैलकर गुरुजींनी केले. या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. श्री ज्ञानेश्वर शिंदे, श्री बसवेश्वर हैलकर, श्रीमती किशोरी पुरोहित, सौ प्रमिला होले, सौ मिनाक्षी लोखंडे, सौ माधुरी घिगे, श्रीमती विजया भोंडवे या माजी शिक्षकांचा ट्रॉफी, शाल,पुस्तक व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नंतर कार्यरत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले पूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन गप्पांचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी पाच वाजता चहा पान होऊन एकमेकांचा निरोप घेतला.सातारा, सांगली, फलटण, कोल्हापूर, चाकण इत्यादी ठिकाणावरून मु ली आल्या होत्या. जवळजवळ 400 मुले मुली उपस्थित होते.कार्यक्रमाचेनिवेदन कुमारी ऋचिका भोंडवे हिने केले.