*पिंपरी चिंचवड शहरात राजराेजसपणे मटका सुरु*

पिंपरी चिंचवड शहरात राजराेजसपणे मटका सुरु!
*पिंपरी सखी न्युज लाईव्ह: औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात ओपन आणि क्लोज मटका चांगलाच जोमात चालला असून लाखो रूपयाची उलाढाली बरोबर वरीष्ठाचे उखळ पांढरे करणार्‍या व अनेकांची घरे व कुटुंबे उध्वस्त करणारा हा मटका कोणाच्या आशिर्वादावर सुरू आहे ? याचा प्रत्यय आज सांगवी भागात आयुक्त यांचे सोबत मान्सुन पुर्व पुर नियंत्रण प्रभाग पाहणी दौऱ्यावर असताना आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे समवेत महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेविका शारदा सोनवणे तसेच संबधित अधिकारी यांनी सांगवी भागातील नदीलगतच्या भागात मान्सुन पुर्व पुर नियंत्रण कामाची पाहणी करीत असताना त्या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये संशयास्पद हालचाली दिसुन आल्या. म्हणून प्रत्यक्ष जावुन पाहणी केली असता काही जणाकडे असणाऱ्या मटक्याच्या चिठ्ठ्या, रोख रक्कम व तत्सम साहित्य त्याच ठिकाणी टाकुन पसार झाले. तसेच त्या ठिकाणी विविध मटका बाजाराचे बोर्ड लावलेले व त्यावर ओपन क्लोज नंबर असलेले आढळून आले. अशाच प्रकारे शहरात अवैध मटका, जुगार, सोरट असे मोठ्या प्रमाणात गैरप्रकार चालु असणार आहेत. शहरात कोरोनाचे सावट असताना याकडे मात्र पोलीस प्रशासनाकडुन जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात गरीबांना शोषित केले जात आहे. याकडे पोलीस प्रशासन लक्ष देणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला.

पिंपरी चिंचवड शहरातील अशा प्रकारचे मटक्याचे धंदे अनेक ठिकाणी सुरु असण्याची शक्यता आहे. मटक्यामुळे या शहरातील अनेक गोरगरीब नागरिकांचे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून मटक्यासाठी अनेक कुटुंबात कौटुंबिक कलह वाढत आहेत हे असेच सुरु राहिले तर अनेक गोरगरीब कुटुंबे व शहरातील युवक या मुळे बरबाद होण्याची भिती आहे, तरी पोलीस यंत्रणेने या अवैध मटका धंद्याकडे वेळीच लक्ष घालुन असा मटका तातडीने बंद करावा, याबाबतच्या सुचना सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिल्या.