*भोसरीमध्ये अजित गव्हाणेंसाठी महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार*

संवाद साधला. प्रतिनिधी –
सखी न्यूज लाईव्ह
सायली कुलकर्णी
प्रश्न अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून सोडवले जातील..त्यामुळे अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन संतोष लांडगे यांनी नागरिकांना केले.
तरुणांचा स्वयंस्फूर्तीने पदयात्रेत सहभाग
आजच्या सभेत युवकांचा अजित गव्हाणे यांना प्रचंड पाठिंबा असल्याचे दिसून आले. अनेक तरुण स्वयं स्फूर्तीने अजित गव्हाणे यांच्यासोबत पदयात्रेत चालताना दिसत होते. यावेळी काही तरुणांना सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरला नाही. तरुणांशी संवाद साधताना अजित गव्हाणे यांनी आगामी काळात आपल्या शहरातील औद्योगिक बेल्ट लक्षात घेऊन स्मॉल क्लस्टर उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मोशी येथील एक्झिबिशन कन्व्हेन्शन सेंटर पूर्णपणे कार्यान्वित व्हावे यासाठी पावले उचलली जातील असे देखील अजित गव्हाणे म्हणाले.
……….
कामगारांशी चर्चा, समस्या सोडविण्याचे आश्वासन
अजित गव्हाणे यांनी शुक्रवारी टाटा मोटर्स कंपनीच्या बाहेर कामगारांशी संवाद साधला. कामगारांची भेट घेऊन आगामी काळात त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. कामगारांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले या औद्योगिक नगरीसाठी शरद पवार यांनी केलेले काम आम्ही विसरलेलो नाही.त्यांच्या माध्यमातूनच येथील कारखानदारीला बळ मिळू शकते याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे.त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीच्या पाठीशी कामगार खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.