*सकल ब्राह्मण समाजाचा भोसरी विधानसभेमध्ये महेश दादा लांडगे यांना पूर्ण पाठिंबा*

प्रतिनिधी – सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णी
, पिंपरी येथे श्री महेश दादा लांडगे यांच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला श्री भावेन पाठक यांच्या अध्यक्षतेखाली सकल ब्राह्मण समाजातील प्रमुख संघटना एकत्र आल्या. त्यामध्ये महाराष्ट्र ब्राह्मण सभा, साउथ इंडियन ब्राह्मण सभा, विप्र फाउंडेशन, अखिल ब्राह्मण संघ, गोवर्धन ब्राह्मण संघ, परशुराम सेवा प्रतिष्ठान आणि इतर ब्राह्मण संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सर्वांनी एकजुटीने निर्णय घेतला की संपूर्ण ब्राह्मण समाज महेश दादा लांडगे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महेश दादा लांडगे यांना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी समाजाने पुढील वीस दिवसांमध्ये जोरदार प्रयत्न करणार आहे.
सर्व ब्राह्मण समाज बांधवांना आवाहन आहे की, जो नेहमीच आपल्या पाठीशी उभा राहिला आहे, त्या महेश दादा लांडगे यांना आपल्या अमूल्य मतांनी विजयी करावे.
जयतु ब्राह्मण समाज!
जय महेश दादा!