बातम्या *शंकर जगतापांच्या ‘लीड’साठी अश्विनी जगताप आणि महिलांचा चिंचवडमध्ये झंझावात* November 9, 2024 Editor प्रतिनिधी – सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णीआमदार अश्विनी जगताप यांच्या उपस्थितीत काळेवाडी परिसरात कोपरा सभा, महिला बचतगटांच्या भेटीस्थानिक महायुतीच्या माजी नगरसेवकांसह विविध नागरिकांच्या गाठीभेटींवर भरचिंचवड : प्रतिनिधी, ८ नोव्हेंबर २०२४ – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी आमदार अश्विनी जगताप यांनी काळेवाडी परिसरात गाठीभेटी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कोपरा सभा, महिला बचत गटांच्या भेटीगाठी, स्थानिकांसह ‘डोअर टू डोअर’ मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि मतदारसंघातील विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. नागरिकांनीही मोठ्या संख्येने या दौऱ्यात सहभाग घेत, मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. यावेळी काळेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी शंकर जगताप यांना विजयी करण्याचा निर्धार काळेवाडी ग्रामस्थांनी केला.आमदार अश्विनी जगताप यांनी या दौऱ्यात विजयनगर मेनरोड, अजिंक्य कॉलनी, सहकार कॉलनी १-२-३, साईनाथ कॉलनी, नढेनगर, प्रेम लोक कॉलनी, शांती कॉलनी, सहारा कॉलनी आधी परिसरात मतदारांची संवाद साधला.यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते राजेश पिल्ले, माजी नगरसेविका नीता पाडाळे, ज्योती भारती, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, विलास पाडाळे, प्रवीण केमसे, कैलास सानप, प्रवीण आहेर, प्रकाश लोहार, रमेश काळे, शिवसेनेचे सुनील पालकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता कोकणे यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार अश्विनी जगताप यांनी या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.यावेळी मतदारांशी संवाद साधताना आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, लक्ष्मणभाऊंच्या कारकिर्दीत काळेवाडीत विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात सुसज्ज रस्ते, अंतर्गत विकासात्मक कामे, पाणीपुरवठा सुधारणा झाली आहे. यापुढेही या काळेवाडी प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हे कटिबद्ध आहेत.आमदार जगताप यांनी या दौऱ्यात महायुती सरकारच्या योजना आणि शंकर जगताप यांच्या विकास कामांची माहिती मतदारांना दिली. शंकर जगताप यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे चिंचवड मतदारसंघाच्या जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शंकर जगताप यांना मोठे मताधिक्य देऊन विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. Post Views: 33