*सद्गुरुनगरमध्ये पाण्याची टाकी अंगावर कोसळुन चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू*

पिंपरी sakhi news live sayali kulkarni
ऑक्टोबर :- भोसरीतील सद्गुरुनगर येथे पाण्याची टाकी अंगावर कोसळुन चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
यात पंधरा ते वीस कामगार जखमी झाले आहेत. सद्गुरुनगरमधील एका लेबर कॅम्पमध्ये हे सर्व वास्तव्य करीत होते. वेळेत रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल न झाल्यामुळे मयतांचा आकडा वाढला, अशी घटनास्थळी हजर असणा-या कामगारांच म्हणन आहे.
घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, प्रशासनाकडून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सद्गुरुनगरमध्ये पाण्याची टाकी अंगावर कोसळुन चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू…