Thursday, August 20, 2026
Latest:

बातम्या

पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी 

कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांबाबत आढावा बैठक, पदोन्नती, सेवा ज्येष्ठता, जुनी पेन्शनसह विविध विषयांवर चर्चा पिंपरी, दि. ७ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

भाटनगर पुनर्वसित इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्रींकडे नगरसेवक संदीप वाघेरे यांचे निवेदन; SRA मार्फत तातडीने प्रस्ताव सादर करण्याची मागणी

पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड शहरातील भाटनगर (सर्व्हे क्र. १७, पिंपरी) येथील ३३ वर्षांहून अधिक जुन्या, मोडकळीस आलेल्या व धोकादायक पुनर्वसित

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

मतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे : उप महापौर शर्मिला बाबर

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक पिंपरी, दि. ६ ऑगस्ट २०२६ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला भारत

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

भामाआसखेड प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या प्रश्नांवर महापौर रवि लांडगे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा… 

शहराच्या पाणीपुरवठ्याला बाधा न आणता प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर व गावाच्या विकासकामांवर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याचे आश्वासन…  पिंपरी, दि.६ ऑगस्ट २०२६:पिंपरीचिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या भामाआसखेड जलवाहिनी प्रकल्पाच्या अनुषंगाने शिवेवाकी तर्फे वाडा येथील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्याशिष्टमंडळाने आज महापौर रवि लांडगे यांची भेट घेऊन गावातील प्रलंबित विकासकामे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.  यावेळी ग्रामस्थांनी भामाआसखेड प्रकल्पासाठी दिलेल्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर गावातील पाणीपुरवठा व जलवाहिनीची प्रलंबित कामे, अंतर्गत रस्ते, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वीजपुरवठा, सांडपाणी व गटार व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, स्मशानभूमी व परिसराचे सुशोभीकरण, मंदिर परिसरातील आवश्यक सुविधा, सभागृह, खेळाचे मैदान, वृक्षारोपण तसेच इतर मूलभूत विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच भामाआसखेड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर महापालिका प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.  ग्रामस्थांनी विविध मागण्या मांडल्यानंतर महापौर रवि लांडगे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा केली. प्रत्येक मागणीची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन संबंधित विभागांमार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्या आणि गावाच्या विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.  महापौर रवि लांडगे म्हणाले,  “भामाआसखेड प्रकल्प हा पिंपरीचिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याला कोणत्याही परिस्थितीत बाधा येऊ न देता हा प्रकल्प नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येईल. त्याचवेळी या प्रकल्पासाठी मोलाचे योगदान दिलेल्या प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्या, प्रलंबित प्रश्न आणि गावाच्या विकासकामांकडेही संवेदनशीलतेने पाहून त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील. शहराचा विकास आणि प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे हित या दोन्ही बाबींचा समतोल राखत प्रशासनामार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.”  यावेळी ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध विषयांबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यावर भर देण्यात आला. गावातील प्रलंबित विकासकामे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे प्राधान्याने आणि टप्प्याटप्प्याने निराकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनामार्फतआवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.  यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच शिवे–वाकी तर्फे वाडा येथील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

मोशी कचरा डेपो दुर्घटना :७ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या खात्यात आर्थिक मदतीची रक्कम जमा 

पिंपरी, दि.६ ऑगस्ट २०२६:मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून जलद गतीने सुरू आहे. महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने करण्यात येत असून, कागदपत्रांची पूर्तता झालेल्या लाभार्थ्यांच्या बँकखात्यात आर्थिक मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.  आतापर्यंत मृत अक्षय सावंत (वय ३५), सन्नी माने (वय ३९), राहुल गायकवाड (वय ३५), वामन कसबे (वय ३५), नागेश गायकवाड (वय २६), सुनील कोरके (वय ४०) आणि रणजीत पाटील (वय २२) यांच्या कायदेशीर वारसांच्या बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत नियमानुसार थेट जमा करण्यात आली आहे.  दुर्घटनेतील मृत भावेश वाणी आणि महेश कुंभार यांच्या कायदेशीर वारसांच्या कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नसल्याने त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदतीची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. संबंधित कागदपत्रे प्राप्त होताच आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या वारसांच्या खात्यातही नियमानुसार आर्थिक मदतीची रक्कम तातडीने जमा करण्यात येणार असल्याचे क्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.  मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच पात्र वारसांच्या बँक खात्यात आर्थिक मदतीची रक्कम थेट जमा केली जात आहे. उर्वरित लाभार्थ्यांची कागदपत्रे प्राप्त होताच त्यांनाही विलंब न लावता आर्थिक मदत वितरित करण्यात येईल.   * डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका  मोशी दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शक्य तितक्या लवकर आर्थिक दिलासा मिळावा, ही महानगरपालिकेची भूमिका आहे. कोणत्याही मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी प्रशासनाला आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरित मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांची आवश्यक कागदपत्रे प्राप्त होताच नियमानुसार आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल.  * रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर द्यावा – मंत्री जयकुमार गोरे

मुंबई : स्वयं सहाय्यता गटांमधील गरीब व गरजू महिलांना विविध उपजीविका उपक्रम, कौशल्य विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

“टेंडर काढून टक्केवारी हवी असेल तर भीक मागून गोळा करून देतो; पण विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करून शालेय साहित्य द्या!”

प्रशासनाचा डीबीटीचा पारदर्शक प्रस्ताव भाजप नगरसेवकांनी फेटाळला; ठेकेदारांच्या फायद्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ – आमआदमी पार्टी युवक आघाडीचा आरोप पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र विशेष मोटार वाहन न्यायालय!

आमदार महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्या लायशमंत्रिमंडळाचा निर्णय; वाहतूक प्रकरणांच्या जलद निपटाऱ्याचा मार्ग मोकळा पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

शहरावार आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी अमित शाह यांना निमंत्रण

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले निमंत्रण पिंपरी –  पिंपरी-चिंचवड शहराच्या ऐतिहासिक विकास प्रवासावर आधारित पुस्तकाच्या लोकार्पणासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित

Read More
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

बिर्ला हॉस्पिटलजवळील पुलाचे तुटलेले कठडे तातडीने दुरुस्त करण्याची विश्वजीत बारणे यांची मागणी

पिंपरी : पिंपरी ते डांगे चौक–चिंचवड मार्गावरील बिर्ला हॉस्पिटलजवळील पुलाचे संरक्षक कठडे मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटले

Read More